उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या, दर्जेदार मुद्राभिनय, स्लपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातीत लवचिकता, हजरजबाबीपणा व अफाट टायमिंग सेन्स!
चंदू पारखी हे महान विनोदवीरच होते. चंदू पारखी यांनी अनेक नाटक व चित्रपटातून भूमिका केल्या. माझा खेळ मांडू दे या नाटकात चंदू पारखी यांनी छोटा रोल स्वीकारून त्याचे चीज केले. आपल्या ढिल्या चालीतून, बेरकी कटाक्षांमधून आणि खोल खर्जातल्या संवादातून त्यांनी गोवर्धनचा भेसूरपणा उभा केला. एरवी इंदुरी नजाकत आणि मूर्तिमंत विनम्रपणाचा अवतार चंदू पारखी रंगमंचावर पाऊल ठेवताच नखशिखान्त बदलून जात असत. निळू फुले म्हणत असत माझी जागा चंदू पारखी घेईल.
चंदू पारखी यांनी जबान संभाल के, आडोस पडोस, रिस्ते नाते, या सिरीयल्स व तमन्ना, अंगारा, या चित्रपटात कामे केली.
चंदू पारखी यांचे १४ एप्रिल १९९७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply