नवीन लेखन...

मराठी नाट्य-सिने अभिनेते मोहन गोखले

घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत मोहन गोखले लीलया वावरले.

मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे.

शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. पुढे सर परशुराम आणि फर्गसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा अभिनय आणि दिग्दर्शन करून गाजविली होती. पुरुषोत्तम करंडकातील ‘ती येते’, ‘कैद’ या त्याच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या. ते राज्यनाट्य स्पर्धेत विजेता पण राहिले होते. त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ‘ घाशीराम कोतवाल ‘ मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ‘ महापूर ‘ हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच ‘मिकी आणि मेमसाब ‘ , सतीश तांबेंचं ‘ बीज ‘ ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं.

मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ‘ कस्तुरीमृग’ आणि ‘सूर्याची पिल्ले’ मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ‘ बेबी’ , ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ , ‘ नरू आणि जान्हवी ‘ ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हेच माझे माहेर’ , ‘माफीचा साक्षीदार’ आणि ‘आज झाले मुक्त मी’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णी यांच्या ‘बन्या -बापू’ मधला प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणारा मोहन गोखले यांचा बन्या प्रेक्षकांना आवडला.

‘श्वेतांबरा’ या मालिकेने मोहन गोखले यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. ‘मिस्टर योगी’ मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी ‘हिरो हिरालाल’,’ मोहन जोशी हाजीर हो’ या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भुमिका केल्या.

समांतर सिनेमांमधेही मोहन गोखले यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या ‘भवनी भवाई’ या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच ‘ मिर्च मसाला’ , सई परांजपेंचा “ स्पर्श’ , सईद मिर्जा यांचा ‘मोहन जोशी हाजिर हो’ , कुंदन शाह यांचा ‘जाने भी दो यारो’ , मीरा नायरच्या ‘ मिसिसीपी मसाला’ या भूमिका चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.

शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी व सखी गोखले ही कन्या. शुभांगी गोखले यांनी अनेक सिनेमे, मालिकांमध्ये कामे केली आहेत. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. त्यांनी ‘आत्मकथा’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. अनेक मालिका, सिनेमांतून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कथा, ललित लेख यांद्वारेही वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मराठी मालिका आणि ‘लापतागंज’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.

कमल हसनाच्या ‘ हे राम ‘ च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना मोहन गोखले यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

मा.मोहन गोखले यांची कारकीर्द

नाटके
कस्तुरीमृग, सावित्री, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, घाशीराम कोतवाल, बीज, सूर्याची पिल्ले, देणाऱ्याचे हात हजार, गिधाडे, हरी अप हरी, नरु आणि जान्हवी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, हसा फुलांनो हसा, मी कुमार, बेबी, शॉर्टकट.

दूरदर्शन मालिका
श्वेतांबरा, देखो मगर प्यारसे, यात्रा,भारत एक खोज, लेखू, दोपहर का ठहराव, जंजीरें, अल्पविराम, मिस्टर योगी, भंवर, सी आय डी, करमचंद, जमीर, जुनून, आशीर्वाद, उजाले की अौर, शक्तीमान, बायबल, आहट, देखो मगर प्यारसे, दुनिया रंग रंगीली.

एकांकिका
मात, कैद, लिफ्ट, ती येते, बदाम राणी चौकट गुलाम, स्वराज्याचा कानमंत्र, झुलता पूल, खलित्यांची लढाई, डियर पिनाक, कदाचित, एका म्हाताऱ्याचा खून.

मराठी चित्रपट
बन्याबापू, ठकास महाठक, हेच माझे माहेर, संसार पाखरांचा, माफीचा साक्षीदार, अरे संसार संसार, आज झाले मुक्त मी, जगावेगळी प्रेमकहाणी, धाकटी जाऊ, अंगार, राजाने वाजवला बाजा, ध्यासपर्व, कैरी.

हिंदी चित्रपट
स्पर्श ,हिरो हिरालाल,मिर्च मसाला,अंधेरनगरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,हंगामा बॉंम्बे स्टाईल ,मोहन जोशी हाजिर हो,कल का आदमी,मिसिसिपी मसाला(English)आदि मिमांसा(अोरिया)भवनी भवाई(गुजराथी)हंसी हंसलाल (गुजराथी)हे राम (अपूर्ण)

दिग्दर्शन
महापूर,बीज,भाऊ मुरारराव,फरारी

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

 

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on मराठी नाट्य-सिने अभिनेते मोहन गोखले

  1. Sir, In the movie Banya Bapu the song ‘preetiche jhuljhul pani’ was picturised on Bal Karve. Mohan Gokhale & Usha Naik are in the song ‘He gard nile megh’. Also there are no records of Mohan Gokhale acting in Jaane Bhi Do Yaaro,].

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..