मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता स्वप्नील जोशी याचा जन्म.१८ ऑक्टोबर १९७७ मुंबईत झाला.
स्वप्नील जोशीने वयाच्या नवव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे.
स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत दिसला, ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रति.
‘चेकमेट’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली होती. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ या चित्रपटातली त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला. ‘दुनियादारी’ मितवा ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली.
हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या लीनाशी त्याने २०११ मध्ये विवाह केला.
स्वप्नील जोशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply