भारतासाठी मार्शल आर्ट हा क्रीडाप्रकार नविन राहिलेला नाही. अनेक खेळाडूंनी स्वत:च्या कर्तृत्वाची मोहोर या खेळांमध्ये अगदी ठशठशीतपणे उमटवून इतिहास निर्माण केलेला आपल्याला दिसून येईल. मार्शल आर्ट मधील कराटे हा जसा गाजलेला क्रीडाप्रकार तसाच “वु-शु” हा देखील त्यापैकी एक ! पण या चायनीज मार्शल आर्ट मध्ये करियर करणारे “मराठी वीर” तसे कमीच. पण कांदिवलीच्या दिनेश माळी या तरुणाने अगदी कमी वयातच या खेळावर प्रभावीत होऊन “वु-शु चॅम्पीयनशिप”चा मानकरी ठरला. आपल्यातल्या गुणाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यायला लावणार्या दिनेश माळीने “वु-शू” सोबतच “कीक बॉक्सिंग”, “ज्युडो”, “जित्शु”, “एम.एम.ए फाइट” या मार्शल आर्ट वर कमालीचे प्राविण्य मिळवत “योगा”, “पॉवर योगा”, “स्के”, “तायची” अश्या मनाला तंदुरुस्त ठेवणार्या भारतीय व चीनी मार्शल आर्ट वर कमालीचे प्रभुत्त्व संपादन केले आहे.
अश्या या अनोख्या मार्शल आर्ट मध्ये निपुणता मिळवत “राष्ट्रीय सुवर्ण पदका”सह शेकडो “मेडल्स” आणि “ट्रॉफी”वर नाव कोरुन स्वत:ची कार्यक्षमता अवघ्या पंचवीसाव्या वर्षी दाखवणारा दिनेश माळी आज अनेक नामांकीत क्रीडा संस्थांमध्ये प्रशिक्षकाची भूमिका देखील पार पाडत असून “मुंबई सबरबन वुशू असोसिएशन” च्या सचिव पदावर कार्यरत आहे. त्याचा मार्गदर्शनात अनेक “वु-शू” व मार्शल आर्टसाठी क्रीडापटू तयार होऊन अनेकांनी राष्ट्रीय स्तरावर देखील दैदिप्यमान कामगिरी पार पाडली आहे. काहीश्या धाडसी व चित्तथरारक वु-शू या मार्शल आर्ट मध्ये महाराष्ट्राची मोहोर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणार्या दिनेश माळी सोबत सागर मालाडकर यांनी केलेली बातचीत ऐकण्यासाठी वर दिलेल्या या आयकॉन वर क्लिक करा…
— सागर मालाडकर
Leave a Reply