संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या ‘उमलते अंकुर’ या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे. सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
संदीप खरे आता ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल. लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.innomobilesystems.skworld
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संदीप खरे यांच्या कविता व गाणी
https://www.youtube.com/watch?v=EThnG-4lp7w
Leave a Reply