नवीन लेखन...

मराठी साहित्यिक, गीतकार प्रवीण दवणे

प्रवीण दवणे यांनी आपल्या बाल वयातच लेखनासाठी प्रारंभ केला. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९५९ रोजी झाला. प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन करत आहेत. प्रवीण दवणे यांनी विविध माध्यमांतून वाड्मयच्या विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांच्या प्रकाशित ग्रंथसंपदा सुमारे साठ पुस्तके मा.प्रवीण दवणे यांच्या नावावर आहेत. “सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” यांसारखी अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह, लेखसंग्रह मा.प्रवीण दवणे यांच्या नावे प्रसिद्ध झाले आहेत. तर “आई परत येते”, “स्माईल प्लीज”, “श्रीयुत सामान्य माणूस”,”प्रिय पप्पा” ही नाटके रंगमंचावर आली आहेत. मा.प्रवीण दवणे यांनी सुमारे ठकास-महाठक, झपाटलेला, आम्ही असू लाडके, आम्ही सातपुते,शुभमंगल सावधान, अदला बदली अशा १२५ मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली आहेत. त्यांनी अनेक भावगीते व भक्तिगीते गाणी लिहिली आहेत. मा.प्रवीण दवणे हे त्यांच्या कविता, लेख, लेखमाला या साठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याही पेक्षा ते एक सामजिक जाणीव असलेला माणूस म्हणून ते जास्त प्रसिद्ध आहेत. मा.प्रवीण दवणे यांना सर्वोत्कृष्ट वाडम़याचा राज्यपुरस्काराचा पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, मा.दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आपल्या ठाण्याविषयी बोलताना मा.प्रवीण दवणे म्हणतात की, कालचे ठाणे हिरवळीचे, नाते संबंधांचे, घरोब्याचे नाते जपणारे होते. आजचे ठाणे ट्रॅफिक जॅमचे, प्रदूषणाचे आणि माणूसपण तुटलेले वाटते, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात काही चिकीचं नाही. हा बदल अपरिहार्य आहे. ठाण्यातल्या समस्यांवर आपलं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असं असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचं ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल यात कोणतेही दुमत नसावे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

प्रवीण दवणे यांची काही गाणी.
कसा प्रकाश पाझरे, घन करुणेचा सूर, चल्‌ झेलूया गाणे, चिंब भिजलेले, ज्यास देव सापडला, तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी, तेजोमय नादब्रह्म हे, दे साद दे हृदया,
दोन रात्रीतील आता संपला, निघालो घेऊन दत्ताची, पाऊस पहिला जणु कान्हुला, माघाची थंडी माघाची, मुक्या हुंदक्याचे गाणे, ही वाट कुणी मंतरली

प्रवीण दवणे यांचे कविता वाचन.

https://youtu.be/oXiXGHtuqwI

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

2 Comments on मराठी साहित्यिक, गीतकार प्रवीण दवणे

  1. …..सह्याद्रीवरील स्वर कवितेचे कार्यक्रमात संत ज्ञानेश्वरांच्या ‘ भाषे ‘ वर बोलताना तुम्ही म्हणालात कि, केवळ भाषेला लडिवाळपणा आणण्यासाठी ज्ञानेश्वर तसा भाषाप्रयोग करतात. मला ह्या बाबतीत अधिक जाणून घ्यायचे आहे. संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे समकालीन. संत नामदेव आपली साधी मराठी वापरतात. ज्ञानेश्वर बरवा म्हणतात, तर आपण बरा म्हणतो. केवळ ज्ञानेश्वरच अशी भाषा वापरतात, मुक्ताबाई सर्वसामान्य भाषा वापरतात. तुम्ही ह्या बाबींवर जास्त प्रकाश टाकाल का…? श्रीवल्लभ ग, ना. करमली, ५८/१, बाणसाय, पोष्ट : कुडचडे-गोवा. ४०३ ७०६. भ्रमण: ९११२९७९७९६.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..