“हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती.
सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले.
‘पाहिले न मी तुला’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘ही नव्हे चांदणी’, ‘दाटून कंठ येतो’, आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,’नवरी मिळे नवर्याीला’, ‘बनवा बनवी’, पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. ‘ससा तो ससा’ हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
क्रिकेटपटू मा.सुनील गावसकर यांनी म्हटलेले, ‘या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…?’ हे गीतही त्यांचेच. चित्रपटसृष्टीत ‘डॅडी’ या नावाने परिचित असलेले शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते.
शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै, २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply