सर्वसाधारणपणे कवितांची, गीतांची आवड असणारे आपण सर्वच असतो. काहीजण विशेष रस दाखवत आणि खोलात जाऊन निरनिराळे प्रयोग ही करतात; बदलापूरच्या अक्षय दांडेकरनी मराठी शब्दांची अनोख्या पध्दतीत बांधणी करुन, त्यामध्ये” र्हीदमॅटीक” प्रवाह निर्माण करत “मराठी रॅप”ची निर्मिती केलीय; मराठीत “रॅप” गाणी निर्माण करणारा अक्षय दांडेकर हा बहुधा पहिलाच मराठी व्यक्ती असावा; कारण मुळातच “रॅप” ही संकल्पना ही आपल्याकडे म्हणावी तशी मुरलेली नाही, पण असे काही संगीतप्रेमी आहे ज्यांनी आपल्या देशाच्या संपूर्ण विचार करत पाश्र्चिमात्य गीत, संगीतावर विविध यशस्वी प्रयोग केलेत. पण मराठीत “रॅप” गाणं बनवताना काही गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यावा लागतात, ते म्हणजे गद्यांची जुळवणूक, असं अक्षय सांगतोच.
पण मुळातच रॅप हा प्रकार काय असं विचारण्यात आलं तेव्हा अगदी अभ्यासपूर्णतेचं उत्तर देऊन अक्षय दांडेकर म्हणतो की, “अमेरिकेतील विविध विषयांवर रचनात्मक पध्दतीनं गायले गेलेलं लोकसंगीत किंवा लोकगीतं,ज्याचा थेट संबंध सामान्य माणसांशी होता”; आपल्याकडे पंजाबी भाषेत अनेक रॅप गाणी आहेत, पण मराठीत एकही अशा पध्दतीचं गाणं नसल्यामुळे खुप खंत वाटत असे की मराठी साहित्य इतकं समृध्द असताना असा प्रयत्न आतापर्यंत का झाला नाही असा ही प्रश्न पडत असे; मग आपणच विशिष्ट विषय घेऊन रॅप निर्माण करावं, असा निश्र्चय अक्षय दांडेकर नी केला. तसंच सुरुवातीला “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच जीवन”,”प्रेम”,”मौज-मजा”,”ब्रेकअप”.”लाईफस्टाईल”, असे तरुणांच्या मनाला भिडतील असे विषय निवडले.ज्याचा युवा पिढीवर खुपच सकारात्मक “इम्पॅक्ट” झाला. थोडक्यात फारसा गाजावाजा आणि कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग न करता सुध्दा अक्षय दांडेकरच्या अनोख्या प्रयोगाला फेसबुकसारख्या सोशल मिडिया साईटवर पाच हजार पेक्षाही अधिक “लाईक्स” मिळाल्यातच “मराठी रॅप”ला जागतिक पातळीवर पोचवायच आहे, त्यासाठी वैविध्यपूर्ण विषय हाताळायचे आहे पण परिस्थितीचा अभ्यास करुन आणि संयम ठेवून असं ही अक्षय नमूद करतो. पण यामध्ये जितकं प्रयोगशील रहाता येईल तेवढंच नवीन शोध लागतील त्यामुळे “मराठी रॅप” अधिक समृध्द होईल असा विश्र्वास तो व्यक्त करतो. याशिवाय अभिनयाची आवडअसलेल्या अक्षय दांडेकरांनी अनेक एकांकिका त्याचबरोबर “जवानी झिंदाबाद”, “पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी”,”बेबंदशाही”,आणि “हॅम्लेट” सारख्या प्रायोगिक नाटकातून आणि मायेची सावली या मराठी मालिकेतून ही विविध भूमिका साकारल्यातच.
भविष्यात “रंगभूमी”,”चित्रपट”,”दूरचित्रवाणी मालिकांमधून” चरित्र्यात्मक बूमिका साकारायच्यात, त्यासोबतच “डबिंग” आणि “व्हॉइस ओव्हर” करायचं आहे, असं अक्षयनी बोलताना सांगितलंच मुळातच कविमन, आवाजाची अनमोल देणगी आणि उपजत अभिनय लाभलेल्या अक्षय दांडेकरला “रॅप”वर पगरयोग करणं हे आव्हानात्मक असलंतरी निश्र्चितच मराठी गीतांमध्ये नाविन्याचा साज चढवल्याशिवाय रहाणार नाही.
— सागर मालाडकर
Leave a Reply