चित्रपट व नाट्य अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा जन्म १० सप्टेंबर १९६५ रोजी झाला.
शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील “नाट्य आराधाना” नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले.
दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली व त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. या गुणी कलाकाराने नानाविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.
शाळेतील दिवसांमध्ये अतुलने नाटकांमधून काम करत अभिनयाची आवड जोपासली. त्यांनी १९९२ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. १९९५ साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी लाभली.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. कुलकर्णी यांना ‘हे राम’ (२०००) आणि ‘चांदनी बार’ (२००२) चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply