भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली “लोकधारा” मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना “सही रे सही” नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल द बेस्ट”, “आमच्या सारखे आम्हीच” आणि “ढॅण्ट ढॅण” या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. भरत जाधव यांनी ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५०० हून अधिक नाटकाचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे. सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराथीत भाषांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply