नवीन लेखन...

मराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले

मराठीतील व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६८ रोजी मालगुंड येथे झाला.

मोरो केशव दामले यांचे वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रावसाहेब मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते.

प्रसिद्ध कवी केशवसुत व पत्रकार सीताराम केशव हे मोरो केशवांचे अनुक्रमे थोरले व धाकटे बंधू. मधले बंधू मोरो केशव दामले हे मराठीतील नामवंत व्याकरणकार म्हणून प्रसिद्धी पावले.

“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले. तसेच या ग्रंथात मोरो केशव दामले त्यांनी व्याकरणविषयक प्रश्नांची इतर अंगेही समोर आणली आहेत. विशेषत: विविध उपपत्तीही संकलित करून त्यांनी त्यांची चिकित्साही केली आहे. हा अभूतपूर्व ग्रंथ लिहून त्यांनी व्याकरणक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली. व्याकरणावर पीएच.डी. करणाऱ्यांसाठी मोरो केशव दामल्यांचे ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा आजही मोलाचा संदर्भग्रंथ आहे.

मोरो केशव दामले यांचे शालेय शिक्षण दाभोळ, बडोदे व अमरावती येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. १८९२ मध्ये बी.ए., व १८९४ मध्ये इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन मोरो केशव दामले हे मुंबई विश्वविद्यालयाचे एम.ए. झाले. त्यासाठी त्यांना डेक्कन कॉलेजची दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. १८९४ ते १९०७ पर्यंत त्यांनी उज्जैन येथील ’माधव कॉलेजात’ लॉजिक व फिलॉसॉफी या विषयांचे अध्यापन केले. १९०८ साली त्यांनी नागपूर येथे ’सिटी स्कूल’वरील सरकारी पद स्वीकारले.

मोरो केशव दामले यांनी १९०४ मध्ये भरलेल्या शुद्धलेखन परिषदेत भाग घेतला होता आणि त्यासंबधीची सडेतोड मते त्यांनी ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केली होती. “व्याकरणकार मोरो केशव दामले‘ हे त्यांचं चरित्र लिहिणारे कृ. श्री. अर्जुनवाडकर त्यांचं वर्णन करतात,

“”साडेपाच फूट उंचीची सशक्त, थोराड देहयष्टी. सदाचरणानं तेजस्वी दिसणारी गौरवर्ण रुबाबदार मुद्रा, भरघोस मिशा, रुंद कपाळ, त्यावर उभे टळटळीत गंध, डोक्यारवर पुणेरी पगडी, अंगात शर्ट, त्यावर पारशी पद्धतीचा बंद गळ्याचा कोट, त्यावर उपरणं, खाली टिळक पद्धतीनं नेसलेलं पांढरं शुभ्र धोतर, पायात मोजे आणि बंदांचे लॉंग बूट अशी त्यांची रुबाबदार मूर्ती संबंधितांच्या मनात आदरयुक्त भीती उत्पन्न करीत असे.‘‘

त्यांच्या या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या लेखनाचीही जोड मिळाली होती. “न्यायशास्त्र‘ या विषयावरील दोन ग्रंथ त्यांनी मराठी भाषेची अल्प सेवा करण्याच्या हेतूनं लिहिले होते. एकोणिसाव्या शतकात समाजाविषयीची आपली कर्तव्यबुद्धी व्यक्त करताना “स्वभाषा‘ हेही समाजधारणेसाठीचं महत्त्वाचं अंग मानलं जात होतं. भाषेविषयीची ही मूल्यभावना आधुनिकपणाच्या संदर्भात महत्त्वाची होती. दामल्यांनी व्याकरण लिहिले तेही याच कर्तव्यभावनेतून.

“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ (उद्‌घाटन व ऊहापोह) हा त्यांचा ग्रंथ दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी १९११ मध्ये प्रकाशित केला आहे. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी १९७० मध्ये या ग्रंथाचं साक्षेपी संपादन केलं असून, देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथानं केवळ मराठी व्याकरणाच्या क्षेत्रावरच नव्हे, तर हिंदी व्याकरणावरही प्रभाव पाडला आहे. हिंदी व्याकरणकार पं. कामताप्रसाद गुरू यांनी त्यांचा आदरानं उल्लेख केला आहे.

मोरो केशव दामले यांचे निधन ३० एप्रिल १९१३ रोजी झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मराठी विश्वकोश.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on मराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले

  1. आपले श्री. मोरो केशव दामले यांच्या विषयी लेखन वाचून भरून पावले. आपणास खूप खूप धन्यवाद.

    चित्रा कुलकर्णी.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..