|| हरी ॐ ||
२००० साली गोंडस बाळ जन्मास आले,
नाव त्याचे “मराठीसृष्टी” ठेवण्यात आले !
बाळ हळू हळू बाळसे धरू लागले,
बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागले !
बुद्धीची झलक आणि तडफ लागली सर्वत्र पसरत,
“मराठीसृष्टी”ची टीम घेत होती प्रचंड मेहेनत !
आता बाळ राहिला नाही तो,
“मराठीसृष्टी वेबपोर्टल” झाला आहे तो !
विश्वातील प्रत्येक घरासाठी,
घरातल्या प्रत्येक माणसांसाठी,
मराठी आवडीने वाचणार्यांसाठी,
भाषेबद्दल प्रेम व आपुलकी असणाऱ्यांसाठी,
पाठवू शकता लेख, कविता आणि बरेच साहित्य,
जर तुम्हाला मराठीत टाईप करता येणे शक्य !
नसेल येत मराठीत टाईप करता,
असेल तसेच पाठवू शकता !
बहुगुणी, बहुरंगी, बहुढंगी, निर्मळ मनाची मराठीसृष्टी,
घुसमटलेल्या मनातील विचारांना वाचाफोडी !
“मराठीसृष्टी वेबपोर्टल” व्यासपीठ किती छान,
लेख, स्पूट, चारोळ्या, कविता आणि साहित्याची खाण !
अडीच लाखहून जास्त नोंदणीकृत सभासद,
आयंशी हजारा पेक्षा जास्त रोजचे वाचक !
यावर आहे सोय “मराठी लेखसंग्रहाची,
मराठी व्यक्ती संदर्भ कोशाची,
ब्लॉग सूची, वेब सूची,
आणि मराठीतून ई-मेल करण्याची,
सोय आहे यात ! हवे तेव्हा, हवे ते, हवे तेवढे लिहू शकण्याची,
चित्रे, छायाचित्रे व व्हीडीयो शेअर करण्याची !
म्हणून म्हणतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
वाहत्या गंगेत चिंब भिजून व
नाहून घ्या !
मनमुराद प्रेमाचा आनंद स्वत:हा घ्या,
आणि दुसर्याला द्या !
आदबशीर बोलणारी
आपली मराठीसृष्टीची टीम !
आपुलकी व प्रेमाने समजावणारी आपली मराठीसृष्टीची टीम !
मराठीचा आग्रह व आदर्श असणारी आपली मराठीसृष्टीची टीम !
“मराठीसृष्टी”च्या ऑफिसमध्ये साधण्या संपर्क,
आहेत पूढील दोन दूरध्वनी क्रमांक,
(०२२) २५४२११८५/२५३३९००३
आणि
इंटरनेट द्वारा काम,
“मराठीसृष्टी डॉट कॉम” !
मराठीसृष्टीकडे पाहुणे म्हणून जाल,
आणि
कायमचे “मराठीसृष्टी”चेच होऊन रहाल !!
<जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
अभिनंदन, मराठीसृष्टी. धन्यवाद, श्री. पटवर्धन, मराठीसृष्टीची महत्वपूर्ण माहिती वाचकांसाठी highlight केल्याबद्दल.
सुभाष स. नाईक