मराठमोळी मॉडेल सुपर उज्वला राऊत जन्म ११ जून १९७८ रोजी झाला.
उज्वला राऊत म्हणजे भारतातली पहिली सुपर मॉडेल. उज्वला राऊत हे मॉडलिंग इंडस्ट्री मधील नावाजलेले नाव आहे. उज्वला राऊतने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९९६ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ जिंकून ‘फेमिना लुक ऑफ द ईयर’ चा पुरस्कार मिळवला होता.
रेम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय मॉडेल होती. उज्वला राऊतने मिलिंद सोमण बरोबर किंगफिशर कैलेंडर हंट स्पर्धेत जज म्हणून काम केले होते. उज्ज्वला राऊतने Elle, Time and Official अशा मासिकाच्या साठी कव्हर गर्ल काम म्हणून काम केले आहे. उज्ज्वला राऊत पहिली भारतीय मॉडेल आहे के जिने फेमस लॉन्जरी व अमेरिकन डिझायनर विक्टोरिया सीक्रेटच्या साठी रॅम्प वॉक केले आहे. उज्वला राऊत ही मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊतची मोठी बहीण आहे. २००४ मध्ये उज्वला राऊतने मैक्सवेल स्टेरी बरोबर लग्न केले होते, पण काही काळाने त्यांचा घटस्फोट झाला होता.
या मराठमोळ्याची सुपर मॉडेलची झलक भारतातील टीव्हीच्या प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. ‘विक्टोरियाज सिक्रेट’ची पहिली भारतीय मॉडेल असा मान मिळवलेली ही सुंदरी लवकरच एका टीव्हीशोमध्ये दिसली. ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या शोवर उज्वला राऊत छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच पाहुणी परीक्षक म्हणून दिसली होती. एमटीव्हीच्या या शोमध्ये एका खास एपिसोडसाठी उज्वलाने हजेरी लावली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply