< DIV>
दुसरा दिवस (२७ फेब्रुवारी) : पाकिस्तान सर्वबाद ३२८. वेस्ट इंडिज १ बाद १४७ (कोन्राड हंट नबाद १००, गॅरी सोबर्स नबाद २०).
तिसरा दिवस (२८ फेब्रुवारी) : वेस्ट इंडिज १ बाद ५०४ (कोन्राड हंट नबाद २४२, गॅरी सोबर्स नबाद २२८).
चौथा दिवस (१ मार्च १९५८)
गारफिल्ड सोबर्स नावाच्या एकवीस वर्षे वयाच्या कॅरिबिअन युवकाने आपले पहिलेच कसोटी शतक द्विशतकापार आणि मग आणखी एका शतकापार नेले. सलामीवीर कोन्राड हंट वैयक्तिक २६० धावांवर धावबाद झाला तेव्हा वेस्ट इंडिजच्या ५३३ धावा झालेल्या होत्या. सोबर्स-हंट ही जोडी १ बाद ८७ धावांवर एकत्र आलेली होती…
या दिवसातील स्वतःची १३७ वी धाव घेत गॅरी सोबर्सने आपली वैयक्तिक धावसंख्या ३६५ वर नेऊन ठेवली आणि लेन हटनचा एका कसोटी डावात सर्वाधिक धावा काढण्याचा (३६४) २० वर्षे टिकलेला विक्रम मोडला. हा विश्वविक्रम होताक्षणी वेस्ट इंडिजचा कर्णधार गेरी अलेक्झांडरने संघाचा डाव घोषित केला. ३ बाद ७९०. वेस्ट इंडिजने हा सामना डावाने जिंकला.
<(धावा-फलंदाज-प्रतिद्वंद्वी-मैदान-वर्ष-कसोटी क्र. या क्रमाने)< DIV>
१६५*, चार्ल्स बॅनरमन, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, मेलबर्न, १८७७, १
२११, बिली मर्डॉक, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, ओवल, १८८४, १६
२८७, टिप फॉस्टर, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, सिडनी, १९०३, ७८
३२५, अँड्र्यू सँडहॅम, इंग्लंड-वेस्ट इंडिज, किंग्स्टन, १९३०, १९३
३३४, डॉन ब्रॅडमन, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, लिड्स, १९३०, १९६
३३६*, वॉली हॅमंड, इंग्लंड-न्युझिलंड, ऑक्लंड, १९३३, २२६
३६४, लेन हटन, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, ओवल, १९३८, २६६
३६५*, गॅरी सोबर्स, वेस्ट इंडिज-पाकिस्तान, किंग्स्टन, १९५८, ४५०
३७५, ब्रायन लारा, वेस्ट इंडिज-इंग्लंड, सेंट जॉन्स, १९९४, १२५९
३८०, मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे, पर्थ, २००३, १६६१
४००*, ब्रायन लारा, वेस्ट इंडिज-इंग्लंड, सेंट जॉन्स, २००४, १६९६
गॅरी सोबर्सचा ३६५ धावांचा विश्वविक्रम आणि कालक्रमानुसार कसोट्यांमधील आजवरचे सर्वाधिक धावांचे डाव
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply