मार्ग मोकळा होण्यासाठी
आधी संकटी जावे
मन घट्ट करुनी
तयासी बघावे
निश्चय करुनी मनाचा
न व्हावे निवृत्त
जगावे लागते सर्वां
कुणा कारणासाठी…
अर्थ–
मार्ग मोकळा होण्यासाठी
आधी संकटी जावे
मन घट्ट करुनी
तयासी बघावे
(आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे. मन घट्ट केलं की समोर काही संकट असेल ते पेलण्याची ताकद ही आपल्याला मिळतेच आणि मग आपण त्याला नीट सामोरे जाऊ शकतो.)
निश्चय करुनी मनाचा
न व्हावे निवृत्त
जगावे लागते सर्वां
कुणा कारणासाठी…
(आयुष्यात मन हादरवून टाकणारे क्षण काही मोजकेच येतात आपल्या वाटेला. पण त्या परिस्थितीत हात पाय गाळून आता मी यातून पूर्ण माघार घेतो आणि सर्व काही सोडून देतो हा विचार करणे म्हणजे भ्याडपणाचे आहे. प्रपंचात असताना आपल्या वर असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पार पाडावीचं लागतात तिथे निवृत्ती घेऊन चालत नाही तर तिथे एखादं ठोस जगण्याचं किंवा कर्तव्याचं कारण डोळ्या समोर ठेऊन जगावच लागतं.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply