सत्यशाश्वत आणि अशाश्वत
अनुभवल्याविना कळत नाही
सत्यप्रेम म्हणजे काय असतं ?
केल्याविना कधी कळत नाही…
विरह देखील काय असतो ?
भोगल्या शिवाय कळत नाही
सुख, दुःख, वेदना देखील
जगल्या शिवाय कळत नाही…
फक्त मीच, हा व्यर्थ अहंभाव
कधीच, कुणाचा टिकत नाही
परदुःख नेहमी शीतल असते
स्वदुःखाचा दाह साहवत नाही…
जीवन पुर्वकर्माचा हिशेब सारा
चुकविण्या शिवाय पर्याय नाही
प्रेम घेणे, प्रेम देणे मर्म संचिती
त्याविण जीवा मोक्षमुक्ती नाही..
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९०
७/११/२०२२
Leave a Reply