नोंदणी पद्धतीने विवाह करून दोघे घरी आले. त्याचा ओसंडून वाहणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काय करू आणि काय नको, तिच्याशी काय बोलू आणि काय नको असं त्याला झालं होतं.
आईने हातात आणून दिलेल्या कॉफीचा घोट घेत तो तिला म्हणाला-
“आज मी फार फार खूश आहे…आनंदात आहे.”
“का रे?”
“मला तुझ्यासारखी बायको मिळाली.”
“म्हणजे कशी?”
“शोधून सापडणार नाही अशी.”
.
.
.
“का गं? काही बोलत नाहीस?”
किंचित हसून ती म्हणाली –
“आठवतं का तुला?”
“काय?”
“पाच वर्षांपूर्वी तू नकार दिला होतास मला!”
— संजीव गोखले.
११/०६/२०२२.
Leave a Reply