मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मार्तंडभैरव (खंडोबा, मल्हारी) याचा उत्सव असतो. या उत्सवाला खंडोबाची नवरात्र असेही म्हणतात. खंडोबा अनेक घराण्यांचे दैवत आहे. या देवतेचा भंडारा उधळला जातो. तो हळदीचा असतो. हळद आयुर्वेदात कफ, कृमी नाशक, जखम भरण्यास सहाय्यभूत, कांतिवर्धक व रक्तशुद्धी करणारी आहे असे सांगितले आहे.
या देवतेची उपासना कर्नाटक प्रांतातून महाराष्ट्रात आली असावी. कारण मैलार हे खंडोबाचे नांव, येळकोटी, भंडार, लंगर वगैरे शब्द कन्नड आहेत. असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.
याचे ध्यान – सुवर्ण पर्वत कांती, मांडीवर म्हाळसा, पांढरा घोडा, हातात खड्ग, देव व ज्ञानवंतांकडून यूजिला जाणारा, राक्षसाच्या डोक्यावर पाय, हातात डमरू, कुत्र्यांनी वेढलेला.
याच दिवशी देवदीपावली सुद्धा असते. मानवांची दिवाळी आश्विनात तर देवांची दिवाळी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला या दिवशी देवांना अभ्यंगस्नान घालण्याची प्रथा आहे. पूजा-अर्चा करून पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करतात. या प्रकारचा कुलाचार अनेक खानदानांतू आढळतो.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply