कलीयुगात करतो मानव मुखवटे धारण,
देतो जन्मसिद्ध हक्क असल्याचे कारण,
मुखवटे धारण करावे लागतात मंत्र्यासंत्र्याना भारी,
त्यातच असते त्यांची मखलाशी खरी !
मुखवट्यांचा इतिहास जुनापुराणा,
भ्रष्टाचारी काळेतोंड लपवाया जागा बरीना?
लाजिरवाण्या कृत्यांचे बटबटीत दर्शन,
झाकाया चुकांना मुखवट्याचे प्रदर्शन,
बलात्कार करताना मुखवटे घालायचे,
मुखवटा काढला की खऱ्या चेहेऱ्याने फिरायचे,
सगळेच चढवतात मुखवटे कसल्याश्या रूपाचे,
होतात गलितगात्र फुटता बिंग मुखवट्याचे !
खोट्या व्यवहारात पडतो मुखवटा गळून,
बाहेर येतो खरा चेहरा खळखळून,
“दुरून डोंगर साजरे” दीसतात,
मुखवट्यांच्या मागे सर्वच असतात !
भाव खायला मुखवट्यांची गरज असते,
गोर गरिबांच्या सेवेत मुखवट्यांची गरज नसते,
मुखवटे घातलेले अंधारात काम करतात,
खऱ्या चेहेर्याचे दिवसा ढवळ्या करतात !
मुखवटे धारकांना टीव्ही शुटींगची हाव,
सात्विक चेहेर्याचा असतो कामात भाव,
शेवटी होते गुदमराया मुखवट्याने,
घेता येतो निर्मळ श्वास मुखवटा काढल्याने !
मुखवट्याने येते दडपण आणि वेडेपण,
उशिरा का होईना येते शहाणपण,
होतो उशीर मुखवटा गळया,
वेळीच लागतो आपला चेहरा कळाया !
मुखवट्याचे जीवन जगणे एक फॅशन बरी,
मुखवट्याविना जगणे तारेवरील सर्कस खरी,
भिती वाटते आरश्यात बघताना आपलेच रुपडे,
नको तो आरसा आणि पुन्हा ते मुखवटे आणि चेहेरे !
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply