मास्टर विनायकांचे पूर्ण विनायक दामोदर कर्नाटकी ब्रह्मचारी, घर की राणी आणि निगाहे ए नफरत या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९०६ रोजी झाला. मास्टर विनायक मराठी बोलपटांना नवं सामर्थ्य मिळवून दिलं. ‘मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक’ असं त्यांना गौरवानं म्हटलं जातं. केवळ धार्मिक कथा, करमणूक, साहस वगैरे कल्पनारम्य विश्वातून मराठी बोलपटांना अर्थपूर्ण करण्याचं मोठंच कार्य विनायकांनी केलं. फक्त अभिनयासाठीच त्यांनी परिश्रम घेतले नाहीत, तर दिग्दर्शन व निर्मितीचंही महत्त्वाचं योगदान केलेलं आहे.
मीनाक्षी (रतन) शिरोडकर या विनायकांबरोबर ‘ब्रह्मचारी’ या बोलपटात नायिकेच्या भूमिकेत होत्या. मीनाक्षी शिरोडकर या मास्टर विनायक यांच्या पत्नी होत. त्या काळी इंग्रजी चित्रपट सोडला, तर मराठी चित्रपटात पोहण्याचे दृश्य नसायचं. तसं दृश्य व तेही पोहण्याच्या पोशाखामध्ये चित्रित होण्याचा मराठी चित्रपटसृष्टीतला तो एतिहासिक प्रसंग. चित्रपट कलावंत उत्तम शिक्षक, साहित्यिक मर्मज्ञ, रसिक, गुणग्राहक व अभ्यासू असेल तर त्याच्या हातून कशा सरस व संस्मरणीय कलाकृती घडतात हे विनायकांचे जीवन बघितल्यावर कळते. विनायक यांचे १९ ऑगस्ट १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- शशिकांत श्रीखंडे / विकिपिडीया
Leave a Reply