रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण तालुक्यात डोंगराच्या कुशीत १२ वाडींचे मसुरे गाव असून,या ठिकाणी वरदगढ हा किल्ला आहे.या गडाजवळच भगवंतगढ तसंच रामगढ स्थित आहेत.अश्या माऊली गावातील माउलीदेवीचं देऊळ वसलं असून,ते सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज आहे.देऊळाभोवती जांभळ्या दगडांची भिंत असून,उत्तर दिशेला दगडी कमान आहे;कमानीतून आत शिरल्यावर भव्य पटांगण लागते.या पटांगणात दोन दिपमाळा आहेतमंदिरातील सभामंडप साधारणत:अठरा फूट रुंद व बावीस फुट लांब आहे.या सभअगृहाच्या कठडेवजा भिंतीतच बसण्यासाठी दगडी बैठकीची सोय केलेली आहे. सभागृहाचे छत कठड्याच्या चौरस खांबावर आधारीत आहे,हे सभागृह ओलांडल्यावर देवीचा प्रशस्त गाभारा नजरेस पडतो,देवीचे अस्तित्व वारुळाच्या रुपात असून, हे वारुळ वीस फुट घेर आणि पंधरा फुट उंच आहे.या वारुळात नागिणीच्या रुपात देवी माउलीचा सहवास असल्याचं भक्त मानतात.अश्विन मासात देवीचे घट बसतात व मोठा उत्सव साजरा केला जातो,तसंच दस-याला मोठी यात्राही भरते.श्री देवी माऊलीला शिवशक्ती म्हणून संबोधतात;ही शिवशक्ती म्हणजे पार्वती असावी असा समज आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply