नवीन लेखन...

व्यायाम आणि तुमची पत्रिका, गुण जुळताय ना?

Match the horoscope: My feet, My size, My exercise!

वर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून.

पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात कि माझ्या सारखा मीच बरका ! कॉपी पेस्ट होणे नाही!

एकच वहाण जोडी सगळ्या पायांना फिट होणे नाही! माझा पाय माझी वहाण!

अगदी याच तत्वावर आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आणि एकमेव म्हणून लक्षात घेत असतो.व्यक्ती वेगळी, विचार वेगळा आणि त्यानुसार चिकित्सा हि वेगवेगळी.

जे वाचक माझे लेख नियमितपणे वाचतात ,त्यांना आता वात दोष ,कफ दोष आणि पित्त दोष या संज्ञा काही नवीन नाही.या दोषांच्या संयोगातून कमी अधिक असण्यातून प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र अशी प्रकृती तयार झालेली असते. वात, पित्त कफ अशी प्रमुख तर वात- पित्त,कफ -पित्त,कफ- वात अशी कॉम्बिनेशन देखील प्रकृतीत असतात.आणि या दोषांच्या बाहुल्याने त्या व्यक्तीची वर उल्लेखिलेली आवाज, बुबुळे,मानसिकता आणि इतरही शारीरिक रचना घडते.

मनुष्याची शारीरिक आणि मानसिक प्रकृती हि कन्सेप्ट म्हणजे आयुर्वेदाने औषधी आणि आरोग्यशास्त्राला दिलेली सगळ्यात मोठी भेट होय. अगदी १० नोबेल कमी पडावे इतकी श्रेष्ठ !असो.

विश्वास बसणार नाही परंतु या प्रकृतीचा मनुष्याच्या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टींवर प्रभाव असतो. शरीराचा बांधा, रंग,केस,नख,उंची, रोगप्रतिकारकता,खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, स्वभाव, चंचलता, स्थैर्य, राग झोप, भूक, छंद, प्रजनन क्षमता, लैंगिक जीवन, व्यायाम, बौद्धिक कल अथवा सरासरी बुध्यांक, होणारे आजार, त्यांचे उपचार हे सर्व प्रकृती आणि त्यातील सहभागी दोष यावर अवलंबून असते. ऋतू, भौगोलिकता आणि इतर बाह्य कारणाचा देखील प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो याला कारण देखील प्रकृतीचं होय!

या लेखात व्यायाम आणि प्रकृती बघुयात!

व्यायामासाठी काही लोक कायम आनंदाने तयार तर काहींचा कल व्यायाम टाळण्यामागे का असतो ? एकाच प्रकारचे व्यायाम १० जण करत असतील तर त्या दहा व्यक्तींमध्ये सारखेच परिणाम का नाही दिसत?व्यायामाने काही लोकांना दिवसभर हलके वाटते तर काही लोकांना प्रचंड अंगदुखी असे का होते?
एकाच कारणामुळे कर्ती करवती एकमेव प्रकृती ! तुमची प्रकृती हीच तुमची खरी पत्रिका किंवा कुंडली!

वात दोष प्रधान प्रकृती:

सातत्य नसणे आणि सतत बदल या दोन गोष्टी वात प्रकृतीच्या लोकांमध्ये निश्चित असतात.
चयापचय क्रियेची अधिक असलेली गती आणि कमी सहनशीलता अथवा एन्ड्युरन्स हेही व्यायामासाठी थोड्या प्रतिकूल गोष्टी असतात.ह्या गोष्टींमुळे ह्या व्यक्तींना पारंपरिक पद्धतीने व्यायामशाळेत जाऊन खूप व्यायाम करणे बरेचदा झेपत नाही असेच दिसते.ह्या व्यक्तींचे वजन पटकन कमी होते.परंतु वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वजन आणि muscle मास वाढविणे हि मोठी अवघड गोष्ट असते. बरेचदा muscle वर्क आऊट आणि प्रोटीन पावडर चा भडीमार देखील काही फरक दाखवत नाही तेंव्हा आपली प्रकृती तर यास कारणीभूत नाही ना याचा नक्की विचार करा.व्यायामानंतर प्रचंड अंगदुखी होणे,संधीशूल होणे हे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसते.
आधुनिक व्यायामशास्त्रात यालाच ectomorph body type असे म्हणतात.

वात प्रकृतीच्या लोकांना खालील व्यायाम सहज साध्य होऊ शकतो.

1.तुलनात्मक सोपे आणि सतत नावीन्य असलेले व्यायामप्रकार याना खूप साजेसे असतात.
2.आधीच वात दोष आधिक्य असल्याने कमी कार्डिओ व्यायाम सुद्धा याना पुरेसे होतात.अतिप्रमाणात कार्डिओ व्यायाम वात वाढवून दुष्परिणाम पण करू शकतो.
3.योग साधना आणि ध्यानधारणा तर या लोकांकरता अगदी योग्य आणि आवश्यक च असलेला व्यायामप्रकार होय.वात प्रकृती व्यक्तींनी नक्कीच करावा.त्याने चंचलता आणि इतर वाताचे मानस प्रकृतीवर योग्य परिणाम साधता येतात.
4.याखेरीज चालणे, बॅडमिंटन,पोहणे हे व्यायामप्रकार हि योग्य होत.
गती आणि चपळता यामुळे बरेच मॅरेथॉन रनर मध्ये वाताचे गुण असू शकते .

पित्त प्रकृती :

पित्त प्रकृतीचे लोक उष्ण गुणाच्या अधिक्याखाली असतात. जिम मध्ये एकेरी पित्त प्रकृतीच्या लोकांना सलग व्यायाम बरेचदा सोसत नाही असे प्रत्यक्षात दिसते.
उष्णतेतील व्यायामप्रकार आणि आऊटडोअर ऍक्टिव्हिटी देखील पित्त प्रकृतीच्या लोकांना खूप काळ सहन होत नाही. चयापचयाची क्रिया(metabolic rate ) ह्या लोकांमध्ये देखील तुलनेत अधिक असते.अधिक वजन वाढतच नाही परंतु अवास्तव वाढलेले वजन पटकन कमी होण्याची प्रवृत्ती पित्त प्रकृतीची खासियत असते. आधुनिक शास्त्रात mesomorph म्हणून ओळखली जाणारी शरीराची ठेवणं पित्त प्रकृतीशी साधर्म्य दाखवते.

पित्त प्रकृतीकरिता खालील व्यायामप्रकार उत्तम होत.

1.माध्यम प्रमाणात कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग.
2.सकाळी लवकर चालणे अथवा सायकलिंग
3.पोहणे हा व्यायाम पित्त प्रकृतीकरिता खूप फायदेशीर असतो.
4.सोप्या ट्रेकस,बॅडमिंटन, इतर मैदानी खेळ काही प्रमाणात फायदेशीर असतात.
5.मुळातील तापट स्वभाव आणि तीव्र रिस्पॉन्स या पित्त प्रधान गुणधर्मावर योग आणि ध्यानधारणा खूप उपयोगी ठरते.

कफ प्रकृती:

स्थैर्य, सातत्य आणि सहनशीलता ह्या जमेच्या बाजूंचे कफ प्रकृतीच्या लोकांना वरदान असते. त्यामुळे व्यायामात सातत्य असते. ह्या व्यक्तीचे वजन लवकर वाढण्याकडे कल असतो आणि वजन कमी करण्याकरिता वेळ हि लागतो.
उष्णता याना उपकारक असल्याने भरपूर घाम येणे हितावह असते. हि लोकं कष्टाचे व्यायाम सोसू शकतात.या लोकांच्या कफ प्रकृतीच्या गुणांचा उत्तम उपयोग जर व्यायामात करवून घेतला तर अतिशय आदर्श परिणाम मिळतात.

कफ प्रकृतीकरिता खालील व्यायामप्रकार उत्तम :

1.मैदानी खेळ जसे क्रिकेट, फुटबॉल.
2.बॅडमिंटन,पोहणे देखी उत्तम परिणाम दाखवतात.
3.नियमित कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग.
4.सायकलिंग आणि अवघड ट्रेक्स देखील बरेचदा हे लोक नेटाने पूर्ण करतात.

प्रकृती खेरीज शरीराच्या ,आहार विहाराच्या आणि ऋतूंच्याही बदलांचा व्यायामाशी संबंध असतो. तो कधीतरी पुढील लेखात बघूच. तूर्त या लेखाचा take home message असा कि एकाच पठडीतील व्यायाम तुम्ही १० लोकांना करायला लावणे म्हणजे ससा,मासा आणि चिमणी ची पळायची शर्यत लावण्यासारखे होईल.

आपली पत्रिका आणि व्यायाम यांचे गुण जुळवा .
आणि मग शुभ मंगल…..व्यायामाचे! मूळ इंग्रजी लेख वर्डप्रेस वर नक्की वाचा.

— वैद्य रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद ,पुणे
९६२३४४८७९८
rupali.panse@gmail.com

वरील लेख दिनांक १४ मे २०१७ रोजी लिहिला. लिखाणात बदल करणे, लेखिकेचे नाव बदलणे अथवा लेखाशी इतर छेडछाड हा कायदेशीर गुन्हा म्हणून ग्राह्य होय.
लेख आवडल्यास लेखिकेचे नाव आणि इतर माहितीसह जसाच्या तसा पुढे पाठवा. आपल्या या कृतीने लिखाणासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कार्यी लागल्याचे समाधान मिळेल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..