नवीन लेखन...

मतदान नव्हे मताधिकार

सध्या सगळीकडे निवडणूकिचे वातावरण आहे.सगळीकडे कोणता पक्ष विजयी होईल कोणता पक्ष पराभवी होईल,राज्या राज्यात कोणत्या पक्षाची सता असेल अशा चर्चा होताना दिसत आहे.आणि सर्व पक्ष आपल्या ताक्तिनिशी प्रचारा मार्फत व जाहिरनाम्यानमार्फत संपूर्ण जनतेला आम्हालाच विजयी करा असे आव्हान करत आहे.निवडणुकीच्या या काळात सर्वच पक्ष जनतेसमोर मतांसाठी विनंती करताना दिसतात याचे कारण म्हणजे आपल्या देशाची लोकशाही पद्धत होय.
२६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारतात संविधान अधिकृतरित्या लागू झाले आणि लोकशाही पद्धत लागू झाली.लोकशाही मध्ये लोकांनी आपल्या पसंतीच्या प्रतिनिधीची नेमणूक करावा यासाठी संविधान कलम ३२४ ते कलम ३२९मध्ये विशेष तरतुदी करण्यात आले आहे.यात कलम ३२४ मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.आणि कलम ३२६ मध्ये लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकासंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत.

संविधानात एक व्यक्ती एक मत या नुसार मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकांला बहाल केला आहे .आणि सर्व नागरिकांना समान मानण्यात आले आहे.लोकशाही पद्धतीनुसार प्रत्येक नागरिक आपल्या मताच्या अधिकारा मार्फत लोक प्रतिनिधीची निवड करू शकतो आणि जर त्या प्रतिनिधीने लोक विकासाच्या कामात दिरंगाई केल्यास पाच वर्षांनी त्याला पराभूतही करू शकतो एवढेच नव्हे तर स्वतः निवडणूक लढवून देशाचे सर्वोच्च पद सुद्धा भूषवू शकतो.

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही. तसेच दान केलेली गोष्ट दान देणाऱ्या व्यक्तीस आपण कायमस्वरूपी देत असतो.परंतु मत हे दर पाच वर्षांनी प्रत्येक नागरिक आपल्याल योग्य वाटेल त्या उमेदवारास देऊ शकतो म्हणजे एकदा दिलेले एका उमेदवारला मत आपण कायमस्वरूपाचे देत नसतो तर पुढच्या येणाऱ्या काळात ते आपण इतर दुसऱ्या कोणा त्यापेक्षा योग्यता सिद्ध करणाऱ्या उमेदवारास देऊ शकतो थोडक्या सत्ता बदल करण्याची ताकद ही लोकांच्या मताधिकारामध्ये असते.अर्थात कोणत्या पक्षाचे सरकार हवे अथवा नको हे सर्वस्वी इथली प्रजा आपल्या मताधिकराच्या सहाय्याने ठरवते.म्हणून मत देने हे मतदान नाही तर तो आपला मताधिकार आहे असे बोलणे अती योग्य ठरेल .व हे प्रत्येक नागरिकांने जाणले पाहिजे लक्षात ठेवले पाहिजे व आपला मताधिकार बजावला पाहिजे.

आजची सध्यस्थिती पाहता असे दिसून येते की, नागरिकांमध्ये निवडणुकीसंबंधी उदासीनता वाढत आहे आणि प्रामुख्याने ही उदासीनता शिक्षित नागरिक आणि तरुणा मध्ये आहे अशी भयाण वास्तविकता दिसून येते. आणि यामुळेचे योग्य उमेदवार निवडला जात नाही आणि त्याची जाणीव निवडणुकीनंतर येणाऱ्या पुढंच्या काळात दिसून होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तरुणांना राजकीय जाणीव असणे गरजेचे आहे आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहे त्या उमेदवाराची पात्रता त्याच्या राजकीय कामाचा,विकास कामाचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे फार महत्वाचे आहे.त्याच बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे प्रलोभने येत असतील तर त्यांना आपण बळी न पडता आपण आपल्या सुज्ञतेणे योग्य त्या उमेदवारास मत देऊन मताधिकार बजावणे फार महत्वाचे आहे.”मते विकत मागणाऱ्या माणसाला समाज पाठिंबा देत नसतो,म्हणून तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करतो.अशा उमेदवाराकडून समाजहिताचे व राष्ट्र हिताची कामे होत नाही.पैसेवाला जर कायदेमंडळात गेला तर तो पैसेवाल्या लोकांचे हितसंरक्षण करील सर्व सामान्य व गरिबांच्या हिताच्या आड येईल.म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व आपली दिशाभूल करून घेऊ नका.” या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारला प्रत्येक नागरिकाने नेहमी मनाजवळ ठेवून मताधिकार सुयोग्यपणे बजावावा आणि समाजहित आणि राष्ट्रहित जोपसावे.व बलशाली लोकशाही राष्ट्र निम्रान करावे.

— अमोल अनिता अशोक तांबे (सिंधुदुर्ग)
मो.नं – ९१३६८२२७१७

Avatar
About अमोल अशोक तांबे 2 Articles
खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत. कविता, लेखन, वाचन यांचा छंद. नाटक, एकांकिका मध्ये काम करतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..