नवीन लेखन...

मातीचे प्रेम मातीशीच – समलिंगी संबंध

“ऋतू पावसाळी, ऋतू माती आणि बियाण्याच्या प्रेमाची” गुणगुणत एक बियाणे मातीपाशी पोहचले. “चल, दूरहट, पावसाळी किडा.”  काय झाले तुला, ओळखले नाही, मी तुझा अनादी काळापासूनचा प्रेमी.  “कधी होता, आता नाही, आता मी शेजारच्या शेतातील मातीशी प्रेम करते”. हे चुकीचे आहे, मातीने बियाण्यावर प्रेम केले पाहिजे, अन्यथा सृष्टीचक्र भंगेल. वसंत येणार नाही. फुलांविना फुलपाखरू मरेल. गवत विना चरणारे जीव मरतील. जंगलाचा राजा शेरखानचा जीव हि जाईल. दाण्या-दाण्यासाठी भांडत मनुष्य हि कालवश होईल. “मी ठेका घेतला आहे, का या सर्वांचा, एवढेच प्रेम उतू जात असेल तर दुसर्या बियाण्यावर प्रेम कर”.  बियाणे मातीत रुजले नाही आणि धरती ओसाड पडली. असे आपण पाहिले आहे का? मातीने-मातीशी प्रेम करण्याचा अधिकार आपण मान्य करतो का? नाही.  कारण हे सृष्टीचक्राच्या विरुद्ध आहे.
मातीत बियाणे रुजत नसेल तर मातीचा डॉक्टर मातीला तपासतो. रोग निदान करतो. मातीची उर्वरा शक्ती वाढविण्याचे  औषध देतो.  युरिया, नत्र, जिंक,  रासायनिक खत, शेण व सेंद्रिय खते इत्यादींचा वापर करून मातीची पोत सुधारल्या जाते. सारांश मातीत बियाणे रुजले पाहिजे याची आपण काळजी घेतो.
मनष्य तर सर्वात बुद्धिमान आणि जीवित प्राणी आहे. पुरुषाने-पुरुषाची शारीरिक संबंध स्थापित करणे असो वा  एका स्त्रीने दुसर्या स्त्रीशी विवाह करणे, हे सर्व सृष्टी नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे सृष्टीचक्र भंगते. समलिंगी आकर्षण, एक मानसिक आजार आहे, विकृती आहे. विकृती नेहमीच समाजात वेगाने पसरते.  याचेच उदाहरण, उपचार करण्याची गोष्टच सोडा, अनेक तथाकथित बुद्धिमान लोक या  रोगाला, रोग मानायला तैयार नाही. उलट अश्या संबंधाना प्रोत्साहन देतात. समलिंगी लोकांना वार्यावर सोडून देतात. पण काही वर्षांनी विकृत प्रेमाचे भूत उतरल्यावर त्यांच्या हाती फक्त निराशा येते. त्यांचे जगणे दूभर होते.
या संबंधांना, मानसिक आजार मानून, योग-ध्यान, उचित औषध-उपचार, इत्यादी करून हा आजार  वेळीच दूर केला पाहिजे. हेच समाजाच्या हिताचे आहे.
— विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..