जगामंदी व्हावी थोर
मनी अशी एक आशा
मातीच्या गंधाने शोभे
मराठी जी मातृभाषा
डंका तिचा वाजतील
मराठमोळी लेकरं
बोल तिचे घुमतील
साताही समुद्रापार
सदैव तिच्या रक्षणा
तत्पर आपण राहू
तिच्या या सामर्थ्याने
नभदिशा धुंद पाहू
अभिजात सहवास
लाभे अनादिकाळाने
चंद्र, सूर्य, तारे नभी
येतील पुन्हा नव्याने
जोडतो मनांत तारा
सह्यगिरीवरी वारा
तिचे गुणगाण गाऊ
तिची आरतीही करा
असा तिचा लाभे लळा
मायलेकरू जिव्हाळा
नम्र असे माझा माथा
जसा पुरात लव्हाळा
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,जि.बीड
सं. ९४२१४४२९९५
Leave a Reply