मातृभू तुझ्या करता,
सर्वस्वाचे देतो दान,
रक्षणासाठी केवळ तुझ्या,
सज्ज माझे पंचप्राण,—!!!
कितीतरी बघ आजवर,
झाले तुझसाठी अर्पित,
बिमोड करून शत्रूचा,
निनाद तुझा गर्जत,—!!!
भारत माते तुझी माती,
आम्हा प्रिय प्राणाहून,—
“पाईक” आहोत तुझे आम्ही,
त्रिवार वंदन तुजसी करुन—!!!
वाचवू आम्ही तुला,
करुन जिवाची कुरवंडी,
तीच खरी तुझी सेवा,
बांधल्या आम्ही खुणगाठी,—!!!
हिम्मत जर कोणी,
करेल माईचा लाल,
वचने तुला आमुची,
दाखवू त्याला माती,—!!!
ध्येय श्रेयस प्रेयस सगळे,
कडेकोट तुझीच निगराणी
निर्भय निडर निर्धास्त असावे,
हीच तुला एक विनवणी,—!!!
किती आले किती गेले,
तुझा घास बळकावण्यां,
परास्त होऊन परत फिरले,
मायदेशी तोंड लपवण्या,—!!
आपली धर्मसंस्कृती कधीही,
आम्ही सोडली नाही,
तुझेच संस्कार मनी,
काढावा किंतु सर्वांनी,—!!!
चांगल्याची चांगले आम्ही,
वाईटांशी बनू कर्दनकाळ,
जगानेही ध्यानी ठेवावे,
देशसेवक इथले हर बाळ,–!!!
माता वाट्याला कुणाच्या,
कधीच गेली नाही,
जो येईल तिच्या मार्गी,
त्याची कधीच खैर नाही,—!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply