झालो आम्ही *धन्य,
मातृभूमीच्या कुशीत विसावलो, वीर मरणाचे स्वप्न पाहिले,
अन् भाग्यवंतही ठरलो,
देशासाठी लढणे एकच ध्यास, बालपणापासून आमची आंस, येतील कितीही संकटे,अडथळे
प्यारी आम्हा भारतमाता, तिच्यापुढे खूप आव्हाने” ठाऊक हरेक वार्ता, तिलाजिवापाडजपणे
सैनिकाचे असते ध्येय,
कोणी काही म्हणो,
ना कदर ना काळजी ,
नको फक्त श्रेय,
जीवन तिलाच अर्पण,
दुसरे नको काही,
पुढील जन्मी होऊ सैनिक,
अशीच वाटते ग्वाही,
नागरिक करतात सर्वस्व ओतून, त्यांचे संसार,
आम्ही नशीबवान शिवाय देशसेवेत रममाण*,-
तरुण पत्नी, गोंडस मुले,
वृद्ध माता -पिता,
आठवण खूप त्यांची येते, धारातीर्थी पडतां,—!!!
आमच्यासाठी वाट बघतील,
कोण सावरेल त्यांना,
आता,कोण कमावेल
करील भविष्यचिंता,–? मुलगाचआधार,त्यांचा,
कोण घेईल त्यांची काळजी, सांभाळत घेईल भार,
संसार उघडा पडून,
राहील पत्नी एकटी,
काढा तुम्हीच समजूत,
करा सांत्वन शेवटी, बाळे कोवळी ती,
निरागस त्यांची मने,
वाट पाहतील बाबांची,
पण त्यांच्याशिवाय राहणे,
कडा पापण्यांच्या ओलावती,
जरी जाहलो पावन,
घेतो निरोप आता,
सेवेत मातेच्या येणार परतून,–!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply