शब्द माझे उतावीळ सदा
या मौनातुनी मुक्त व्हावया
तू मात्र अशी कां ?अबोली
कसे लावू तुजसी बोलावया
अव्यक्तातुनीही प्रीत उमजते
तुज लागावे कां ? समजावया
मौन छळतेच जीवा जिव्हारी
हे तुलाही कां ? हवे सांगावया
उमलुदे आता मनभावनांना
फुलुदे, कळ्यांना गंधाळाया
ब्रह्मानंद तोच सुगंध परिमल
जीव आसुसला तुज भेटावया
शब्दभावनां माझ्या उतावीळ
तुझ्याशीच संवाद साधावया
नको, आता असा हा दुरावा
हे नको कां ? गे तुला कळाया
रचना क्र. ६२
२९/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply