मला अजूनही कळले नाही
तुझ्यात, मीच गुंतलो कसा
मनास ध्यास हा नित्य तुझा
नकळे तुझ्यात गुंतलो कसा
जगी सारी नाती ऋणानुबंधी
सत्यसाक्षी, हे अनादिकाली
कां? हीच ओढ गतजन्मांची
मीच तुझ्यात गुंतलो हा असा
वास्तव! आज तसे दुरत्वाचे
दुर्भाग्य! भाळी हे प्राक्तनाचे
दग्धता ही नां कधी शमणारी
तरी तव स्मरणी जगतो असा
उरी आर्त ओढ प्रीतभावनांची
घनमेघ, आठवांचे ते दाटलेले
लोचनी रूप तुझेच तरळलेले
सावरूनी मी जगतो हा असा
मी भाव तुझे ओळखून आहे
प्रीतासक्त! तूं, तरीही अबोल
छळते, मौन हे तुझे जिव्हारी
तरीही मी प्रतीक्षेत उभा असा
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५५.
२२ – २ – २०२२.
Leave a Reply