नवीन लेखन...

माझं घरटं

एक चिमणी एका शहरात रहात होती. तिच्या सोबत तिची मुलगी, म्हणजेच छोटी चिमणी (चिऊताई) सुद्धा होती. कधी एखाद्या बिल्डिंगच्या खिडकीच्या कोपर्‍यात त्यांचा निवास असायचा, तर कधी एखाद्या पाईपमध्ये. कधी त्या टेरेसवर वाळत घातलेल्या धान्यावर ताव मारायच्या तर कधी कोणाच्या खिडकीतून घरात जावून धान्य चोरायच्या. त्या शहरात त्यांचे नातेवाईक होते पण खूप लांब लांब चुकूनच कधी तरी भेट व्हायची. चिमणी कधी चिऊताईला एकटी सोडत नसे.

त्याच शहरात राहणार्‍या कबुतरांचे मात्र कळपच्या कळप एकत्र रहायचे. त्यांना धान्य पाण्यासाठी शहरात ठिकठिकाणी वेगळी जागा होती, जिथ बरेच लोक धान्य-पाणी आणून देत असत….. तिथ जावून धान्य खाण तर चिमणीला शक्यच नसायच कबूतर जवळही येवू द्यायचे नाहीत.

एकदा चिमणी चिऊताईला म्हणाली, चल आपण तुझ्या आजोळी जाऊ. चिऊताईही खुश झाली.

आजोळ तस बरच दूर होत. पहाटेच दोघी निघाल्या, बराच वेळ शहरच संपत नव्हत. उडून उडून चिऊताई दमली, थोडा वेळ एका बिल्डिंगच्या टेरेसवर आराम करून परत निघाल्या, जस जस आजोळ जवळ येवू लागल तसतस बिल्डिंगी दूर गेल्या आणि कौलारू घर, मोठमोठी झाड दिसू लागली. शुद्ध हवा येऊ लागली. हे सगळ पाहून चिऊताईचा थकवा ऊडून गेला. ती चिमणीला म्हणाली, किती मस्त आहे हे. चिमणी म्हणाली, हो ईथल वातावरणच छान आहे. उडता उडता त्या एका तलावाकाठी आल्या तिथ तर चिऊताई पाण्यात बागडूच लागली ‘‘वाव मस्त’’ तिने चिमणीला मिठीच मारली. चिऊताईचा आनंद पाहून चिमणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. थोडच पुढ गेल्यावर त्यांना शेती दिसली, तिथ त्या धान्य खायला थांबल्या, शेतकरी आल्याच लक्षात येताच त्या उडाल्या, पण….. आत्ता उडताना त्या दोघीच नव्हत्या तर अजून बर्‍याच चिमण्या त्यांच्यासोबत होत्या.

उडत उडत एका जंगलात गेल्या. काही चिमण्या आपापल्या घरट्यात गेल्या. काही झाडावर बसल्या त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. घरट पाहून चिऊताईने चिमणीला विचारले ते काय आहे? चिमणी म्हणाली ते आपल घर (घरट) आहे. ते ऐकून चिऊताई म्हणाली, मीही माझ घरट बांधेन इथच. चिमणीने तिला कुशित घेतल  आणि म्हणाली, तू आत्ता बागडू शकतेस हे ऐकून चिऊताई भुर्रर्रर्रकन उडाली.

— तेजस्विनी महातुंगडे 

1 Comment on माझं घरटं

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..