‘माझं काही……… उरलं नाही.’
जीवनांत या जगण्यासारखं,
फार काही राहिलं नाही….
निराश झालं आहे मन,
आत्ता काही उरलं नाही….
नाही नोकरी – नाही पैसा,
फक्त होता आधार तुझा….
पण…. तुझ्या जाण्यानं,
तो – ही आत्ता राहिला नाही….
जीवनांत मी इतरांसारख,
फार असं काही केलं नाही….
फक्त तू.. अन् तुझा विचार,
तुझ्याविनं काही पाहिलं नाही….
माझं माझं म्हणावं असं,
माझं काही राहिलंच नाही….
एक – होतं प्रेम माझं,
ते ही तुला कळलं नाही….
“जीवनात या जगण्यासारखं,
माझं काही राहिलं नाही ”
— गजानन साताप्पा मोहिते