रसिक मित्र हो
माझा लेखन प्रवास 1983-84 साला पासून सुरु झालेला आहे. सातत्य-सराव- स्वाध्याय ‘ ही लेखनाची त्रि-सुत्री आरंभापासून कायम आहे.
आरंभी म्हणजे 1983 ते 1997 अशी 14 वर्ष मी फक्त कथा, लेख, बालकथा असे गद्य लेखन केले.
परभणीच्या वास्तव्यात कवी आणि कविता सहवास घडत गेला आणि माझ्यातील कवी ला आविष्कृत होण्यास अनुकूल वातावरण मिळाले.
1997 पासून माझे कविता लेखन सुरु झाले, परभणीच्या काव्य रजनी मंडळाने कविता उपक्रमातून मला कवी म्हणून घडवले. मराठवाडा साहित्य सम्मेलने, परभणी जिल्हा साहित्य संमेलने, स्थानिक कवी संमेलने यातून मी माझ्या कविता सादर करू लागलो.
दरवेळी नवी कविता’सादर करण्याची सवय लावून घेतली, त्यामुळे लेखन होत गेले.
औरंगाबाद सकाळ रविवार कविता पुरावणीतून माझ्या कवितांना प्रसिद्धी मिळाली आणि माझ्या कवितांना रसिक वाचक मिळाले, या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मासिकांना कविता पाठवणे सुरु केले.
1998-99 मध्ये श्री.श्याम पेंढारी यांचे कवितेला प्राधान्य देणारे कुसुमाकर “हे मासिक सुरु झाले, या मासिकाने कवी म्हणून ओळख मिळवून दिली आहे. या कुसुमाकर ” साठी आज ही मी लिहितो आहे.
पेपर, मासिके, दिवाळी अंकातून माझ्या कवितांना महाराष्ट्रभरातून प्रसिद्धी मिळत गेली. या आनंदात माझा पहिला कविता संग्रह – “गानेदिवाणे” 2003 साली परभणी येथे झालेल्या 25 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात प्रकाशित झाला.
गाणे दिवाणे या पहिल्या कविता संग्रहास खूप छान प्रतिसाद मिळाला. कवी,”म्हणून एक ओळख अधिक ठळक होत गेली. नामवंत कवींनी, माझ्या पहिल्या कविता संग्रहास अभिप्राय पत्र पाठवून खूप प्रोत्साहन दिले. पेपर नि मासिकातून परिचय लेख आले. या मुळे आपण कविता लेखन नक्कीच करू शकतो’ , आणि मनात वाटणारा लेखन-संकोच कमी झाला.
व्यक्त होण्यासाठी” कविता अधिक जवळची वाटत गेली, माणूस आणि त्याचे भावनिक जग “, हे माझे कविता विषय झाले.
मोठ्यांच्या साठी लेखन करतांना मी बालसाहित्याचा साहित्यिक म्हणून काम करीत होतो, यामुळेच ‘बालकविता ‘,
लेखन सुरु होतेच. यातूनच माझ्या बालकविता संग्रह रूपाने प्रसिद्ध झाल्या, गोड गोड चिकोबा”,
हा संग्रह 2003 साली ,25 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या “बाल मेळाव्यात, सुप्रसिद्ध कवी- इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशित ,झाला.
2003 साली गाणे दिवाणे ,आणि गोड गोड चिकोबा ,हे 2 कविता संग्रह आल्या नंतर, कवी संमेलन, साहित्य संमेलनातील कवी संमेलन या व्यासपीठवरून कविता वाचन सादर करण्याचे योग येणे सुरु झाले.
मंचीय-कवितेत मी फारसा रमलो नाही.
नियतकालिकांतून आपल्या कविता वाचून रसिकांनी प्रतिसाद द्यावा,हे जास्त योग्य वाटत आले आहे.
परभणीच्या काव्य रजनी मंडळ ,या साहित्य व्यासपीठा कडून माझ्यावर कविता लेखन संस्कार झाले,
परभणी जिल्हा साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन यात झालेल्या अनेक कवी संमेलनात कवी म्हणून माझा सहभाग 2010 पर्यंत होत होता.
यातील उल्लेखनीय आठवण –
2005 साली परभणीला अ.भा.मराठी बाल कुमार साहित्य संमेलन झाले,
जेष्ठ साहित्यीक लीला दीक्षित या संमेलनाध्यक्ष होत्या.
या संमेलनात मी कार्यकारिणी आयोजक पदाधिकारी म्हणून काम केले-हा माझा सन्मानच झाला,अशी भावना आहे.
या संमेलनात माझ्या दुसऱ्या बाल- कविता संग्रहाचे – माझा तिरंगा प्यारा”
माझ्या दुसऱ्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
जनशक्ती वाचन चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांच्या पुस्तक प्रदर्शन स्टॉल वर झाले.
कवी मित्र इंद्रजित भालेराव,रेणू पाचपोर, श्रीकांत उमरीकर या वेळी माझ्या सोबत होते , असे आता आठवते .
साकेत प्रकाशन औरंगाबाद आणि जेष्ठ साहित्यीक बाबा भांड यांनी माझा हा बाल कविता संग्रह प्रकाशित केला…
पुढच्या लेखात अजून नवे ..
— अरुण वि. देशपांडे
पुणे
९८५०१७७३४२
Leave a Reply