जीवाची राणी लिहिती कहाणी । गातिया गाणी माझी जीवाची राणी !
गावच्या राणातली नदीच्या पात्रातली झाडावरच्या पाकळीची ।
लिहिती कहाणी । गतिया गाणी । माझी जीवाची राणी !
बागेतील रोपांचे । रोपांच्या कळीची । कळीच्या फुलांची । फुलांच्या पाकळीची । मनातल्या शब्दांशी । शब्दाच्या भावनेशी । भावनेच्या प्रेमाची !
लिहितिया कहाणी । गातीय गाणी । माझी जीवाची राणी !
रात्रीच्या स्वप्नांशी । स्वप्नातल्या परीची । परीच्या राजाची । राजाच्या प्रेमाची !
लिहितिया कहाणी । गातिया गाणी । माझी जीवाची राणी,,,,,,माझी जीवाची राणी !
।। कवी।। (सचिन जाधव)