माझ्या बाबांच्या शुक्राणूतून
आलेली २३ गुणसूत्रं
माझ्या आअीच्या पक्व बीजांडातून
आलेली २३ गुणसूत्रं
मिळून झाला ४६ गुणसूत्रांचा
माझ्या गर्भपिंडाचा आराखडा …
त्यानंच ठरविलं माझं
रूपमत्व, व्यक्तीमत्व आणि बुध्दीमत्व
त्यानंच ठरविला माझा जीवनप्रवास
त्यानंच ठरविलं माझं जन्मनक्षत्र
नाडी, गण, योनी आणि जन्मरास
या गुणसूत्रांत …
नाही शनी, नाही मंगळ,
नाही राहू नाही केतू
कुणी नाही वक्री …
कुणाची नाही दृष्टी वाकडी,
नाही साडेसाती,
नाही ग्रहांची पीडा किंवा कृपा
कशासाठी जाअू ज्योतिषीकडे?
निसर्गानंच लिहीली …
माझी …… जन्मपत्रिका …
— गजानन वामनाचार्य, मुंबअी
Mumbai