नवीन लेखन...

माझ्या आठवणीतले बापूराव.

आम्ही त्या वेळी विदर्भातील वर्धा या शहरी रहात होतो. माझे वडील वर्धा येथील गुरांच्या दवाखान्यात व्हेटरनरी डॉक्टर म्हणून नेमणुकीस होते. त्या वेळी माझे वय साधारण ५ वर्षांचे असेल. मी सर्वात मोठा. माझ्या पाठी ओळीने ३ बहिणी होत्या. माझा धाकटा भाऊ माझ्या पेक्षा १४ वर्षाने लहान असल्याने त्याचा प्रवेश आमच्या कुटुंबात व्हावयाचा होता. माझं आजोळ (आईच माहेर) वर्ध्याच. वर्ध्याला रामनगर भागात माझ्या आजोबांचे प्रशस्त घर होत. माझ्या आईची सर्वात मोठी बहिण म्हणजे आमची ताई मावशी. ती माझ्या आजोबां बरोबर वर्ध्यालाच राहत होती. तिला देखील ४च अपत्ये होती. मोठी सुमाताई,(सुषमा) नंतर श्रीदादा, (डॉ.श्रीकांत चोरघडे) कुंदा, (डॉ.कुंदा ओक} आणी धाकटी प्रभा (सौ.स्नेहलता पिटकर). आम्हा मावस भावंडांत सख्ख्या भावंडा सारखाच एकोपा होता.

माझी ताई मावशी ही व्यवसायाने डॉक्टर होती. डॉक्टर वनिता वामन चोरघडे. आम्ही मावस भावंडे एकाच शहरात राहत असल्याने आमचे एकमेकांकडे सततचे जाणे येणे असे. माझ्या मावशीचे यजमान म्हणजेच प्रसिध्द कथाकार, लेखक व साहित्यिक प्राध्यापक वामन कृष्ण चोरघडे. आम्ही त्यांना बाबा म्हणूनच संबोधित होतो. यंदाचे वर्ष हे त्यांच्या जन्म शाताब्द्धीचे वर्ष आहे. त्या निमित्याने त्यांच्या काही हृद्य आठवणी.

बाबांची मला असलेली सर्वात पहिली आठवण म्हणजे, फटफटी या त्या काळच्या दुचाकी वाहना वरून येणारे बापूराव. माझे वडील व आई त्यांना बापूराव म्हणूनच हाक मारीत असत. त्या वेळी म्हणजे १९५०-५१ मध्ये फट फट फट फट….. असा आवाज करीत, येणाऱ्याची वर्दी साऱ्या आसमंताला देणाऱ्या फट-फटीचा थाट काही न्याराच होता.

फट फट फट…या आवाजा वरूनच त्यास फटफटी असे नाव पडले होते. ते नाव त्याची बोलती बंद करणारे सायलेन्सर चे कुलूप लागे पर्यंत प्रचलित होते. तर त्या काळी अशी फटफटी वापरणारे व घरात ग्राामोफोन आणी रेडीओ असणारे बापूराव म्हणजे माझे साठी जगातील सर्वात श्रीमंत इसम होते. पिळदार शरीराचे व सहा सव्वासहा फुट उंचीचे त्यांचे आडदांड व दरारा वाढविणारे राजस व्यक्तिमत्व त्या फट फटी वर शोभून दिसत असे. अशा या बापूरावांचा ती फटफटी रुबाब वाढवीत होती तर असे हे रुबाबदार व्यक्तीमत्व त्या फट-फटी ची शान वाढवीत असे.. त्यांचे ते रूप माझ्या मनात कायमचे कोरल्या गेले. त्या वेळचे बापूराव माझ्या मनात असे ठसले.

ते घरी आले की आम्हा भावंडांना जवळ घेउन बसत व छान छान गोष्टी सांगत. जेवण झाल्यावर वामकुक्षी करताना मला जवळ घेउन त्यांनी सांगितलेली चम्पा राणीची गोष्ट अजूनही मनात रुंजी घालत असते. ही गोष्ट त्यांनीच लिहिलेली होती. माझी चिमुकली सुंदर राजकन्ये सारखी दिसणारी नात जेंव्हा अवखळपणे स्वत:चा फ्रॉक सावरत मांडी पसरून बसताना पाहतो तेंव्हा चंपाराणीच्या कथेतल्या राजकन्येच्या पदान्गुलीतून झुळु झुळु वाहणारा पाण्याचा निर्मळ झरा बापूरावांची आठवण ताजी करतो.

स्वत: बाबा (प्रा. वामन कृष्ण चोरघडे) हे नागपूरच्या गोविंदराम सेक्सेरिया या कॉलेज मध्ये मराठी व अर्थशास्त्र हे विषय शिकवीत असत. नागपूरला त्यामुळे ते एकटेच राहत होते व कॉलेजला सुटी असली की वर्ध्याला येत.

स्वावलंबन हा बाबांचा मंत्र होता. ते स्वत:ची सर्व कामे स्वत:च करावयाचे व परिवारातील सर्वांनी त्याचा अवलंब करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. नेमून दिलेल्या कामात कोणी कुचराई केलेली त्यांना सहन होत नसे. बाबा अतिशय कडक शिस्तीचे होते. घरातील शिस्त जरा जरी कोणाकडून मोडल्या गेली की त्यांच्या रागाचा पारावर नसे. ते मग सर्वांना फैलावर घेत. त्यांचा राग शांत होई पर्यंत घरातील सर्व जण मग चिडीचिप असत. त्यांचा राग त्या वेळी तरी आम्हास अति भयंकर वाटायचा. ते ज्याच्यावर रागावतील त्याची घाबरून बोबडीच वळायची व त्यांच्याा हातून आणखीनच चुका व्हायच्या. त्यांचा तो कोप आम्ही भावंडांनी देखील अनुभवला आहे. अशावेळी त्यांच्या समोर कोणीही उभे राहण्यास धजावत नसे.

इतर वेळी मात्र ते सर्वांशीच अतिशय प्रेमाने वागत व सगळ्यांचीच अतिशय काळजी घेत असत. आम्हास हौसेने सिनेमास घेउन जात. सर्व मुलांना जमवून कवितेच्या तसेंच गाण्याच्या भेंड्या लावत. त्यांचा आणखी एक विशेष म्हणजे ते सकाळी घरातल्या सर्वांना बरोबर टेबलवर एकत्र बसून नाश्ता करीत असत. रात्रीच्या काही पोळ्या उरल्या असल्यास, त्याचा स्वत:च्या हाताने कुस्करा करून त्यात आमटी अथवा फोडणीचे वरण घालून व हाताने फोडलेला कांदा मिसळून त्यावर तेल घालून छानसा काला करीत. आम्ही सर्व जण त्यांच्या सह मग तो काला मोठ्या चवीने मिटक्या मारीत खात असू. त्याच्या आठवणीने आज् देखील तोंडाला पाणी सुटते.

आम्हा मावस भावंडात इतके प्रेम होत की आम्ही जर भेटलो नाही तर आम्हास चैन पडत नसे. त्यामुळे आमचे वर्धेला असताना एकमेकांकडे वारंवार येणे-जाणे होत असे. काही दिवसांनी म्हणजे १९५३-५४ मध्ये माझ्या वडिलांची बदली दर्यापूर येथे झाली. त्या मुळे आमचे एकमेकांना भेटणे फक्त उन्हाळ्याच्या सुटीतच होत असे. कधी ती भावंडे दर्यापूर येथे येत तर कधी आम्ही नागपूरला जात असू.

या वेळ पर्यंत बाबांनी नागपूर येथे धरमपेठ या वस्तीत प्लॉट घेउन नवीन घर बांधावयास घेतले होते. काही खोल्या बांधून होताच चोरघडे कुटुंब नागपूरला त्यांच्या नवीन ‘राजीव’ या बंगल्यात स्थलांतरित झाले होते. मला मावशीचे बांधून तयार होत असलेले घर बघावयाचे होते. मी आईपाशी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला जाण्याचा हट्ट धरला होता. उन्हाळ्याची सुटी लागताच माझी आई मला व माझ्या पाठची बहिण बेबी ला घेउन नागपूरला आली. त्या वेळी आजच्या सारखे सर्वांकडे सर्रास फोन नव्हते. संपर्काचे फक्त पत्र हेच एकमेव साधन होते. आम्ही नागपूरला येत असल्याचे आईने मावशीला पत्राने कळवले होते पण ते पत्र नागपूरला आम्ही पोहचेपर्यंत मिळालेच नव्हते.

आम्ही मावशीकडे गेलो तेंव्हा मावशी मुलांना घेउन जबलपूर जवळील मंडला या गावी त्यांच्या परिचितांच्या आमंत्रणावरून १५ दिवसांसाठी गेलेली होती. घरी फक्त बाबाच होते. आम्ही दर्यापुरला परतण्याचा विचार करीत होतो पण बाबांनी मला व बेबीला मावशी व मुले ५-६ दिवसात परत येत असल्याने तेथेच त्यांच्या जवळ ठेवून घेतले. आई दर्यापुरला परत गेली.

त्या वेळी बाबांच्या नवीन घराचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. पुढील २ खोल्यांवर नुकतीच स्लाब पडलेली होती. बाबांनी आम्हा दोघांना काही कामे नेमून दिली होती. त्यापैकी एक म्हणजे दिवसातून २ वेळा नवीन पडलेल्या स्लाब ला नळीने पाणी देणे, दुसरे स्वयंपाक घरातील माठात पाणी भरून ठेवणे व दिवसात सकाळ-संध्याकाळी घरातील केर काढणे तेथील माझ्या वास्तव्यात मला ते रोज नविन नवीन गोष्टींची पुस्तके वाचावयास आणून देत. मी देखील आणून दिलेल्या पुस्तकांचा आधाशासारखा फडशा पाडीत असे. वाचण्याचा छंद मला त्यांच्या मुळेच लागला होता. बाबा आमचे तिघांचे जेवण स्वत:च बनवीत होते. आम्ही तिघेही मग एकत्र बसून जेवत असू. ते आम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी सांगत.

आठ–पंधरा दिवसांतून एक दिवस ते स्वत: घर कामा साठी काढीत. सर्व घराची साफ-सफाई स्वत:च्या निगराणीत घरातील सर्वांकडून करून घेत व स्वत:ही करीत असत.

तेथे असताना एकदिवशी त्यांनी घरच्या सफाईचे काम सकाळ पासून हाती घेतले. दिमतीस आम्ही दोघे भाऊ-बहिण होतो. का कोणास ठाऊक पण त्या दिवशी घरातील पिण्याचे पाणी भरण्याचे काम त्यांनी स्वत:च करण्याचे ठरविले व आम्हास स्लाबला पाणी देण्यास सांगितले. आम्ही स्लाबला पाणी घालून खाली आलो तेंव्हा बाबा स्वयंपाक घरातील माठात पाणी भरत होतेे. ते पाणी भरत असताना त्यांना अचानक माठाच्या मागे काही हालचाल दिसली. त्यांनी सावध होऊन पहिले तो मागे भिंतीजवळ एक लांब लचक असा पिवळा धमक साप फुत्कारताना दिसला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंडाव्या साठी त्याने पाण्याच्या माठा जवळ आसरा घेतला होता. बाबांनी लगेच आम्हास दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितले. ते बाहेर गेले. येताना त्यांच्या बरोबर घरी माळी-काम करणारा १७-१८ वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाचे हातात एका टोकाला व्ही सारखा आकार असलेली लांब काठी होती व बाबांच्या हातात एक लांबसर बांबूची पातळ कमची होती. त्याला घेउन ते माठा जवळ गेले. आम्ही दुसऱ्या खोलीत जाण्याचे भासवून खोलीच्या दारा बाहेरून बाबा काय करतात ते भयं व उत्स्चुकते पोटी लपून पहात होतो.

बाबा त्या सापास हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते परंतु तो साप काही दाद देत नव्हता व फुत्कारून अंगावर येत होता. बरोबर आलेल्या मुलाने त्याच्या काठीच्या व्ही आकाराच्या टोकाने सापाचे तोंडाखाली मानेपाशी दाबून धरले व बाबांनी कमचीने त्या सापाच्या तोंडावर वार केला. वार बरोबर वर्मी लागून सापाचे तोंड चिरल्या गेले. काही वेळातच तो साप तडफडून वळवळत गतप्राण झाला. टळलेल्या अघटीत गंभीर प्रसंगाच्या कल्पनेनेच ते ओलावले होते. त्यातून सावरत त्यांनी या प्रसंगाने भेदरलेल्या आम्हा दोघांना आवेगाने पोटाशी धरले व अतिशय ममतेने आम्हाला थोपटत पाणावलेल्या डोळ्याने ‘ आज मला स्वत: पाणी भरण्याची देवानेच सुबुध्दी दिली’ असे म्हणत एक भयंकर घटना टाळल्या बद्दल देवाचे आभार मानले.

कठीण अशा श्रीफळाच्या आतील गोड शहाळ्याचे असे दर्शन त्या दिवशी आम्हास घडले. बाबा साहित्यक असल्याने त्यांचा मित्र परिवार फार मोठा होता. पुढे माझ्या वडिलांची बदली नागपूर येथे झाल्यावर आम्ही त्यांच्याच घरात तळ मजल्यावर राहत होतो. आमच्या स्वयंपाक घराला लागूनच त्यांची अभ्यासिका होती. कॉलेज मधील वेळे व्यतिरिक्त त्यांचा बहुतेक वेळ या अभ्यासिकेतच वाचन व लिखाणात ते व्यतीत करीत असत. त्यांच्याकडे लेखक व विचारवन्तांची कायम वर्दळ असे. बहुतेक सर्व क्षेत्रातील अग्रणींचा पदस्पर्श त्यांचे वास्तूस झाला होता. साहित्य व कला क्षेत्रातील विदुषींची नागपूर भेट प्रा.वामन कृष्ण चोरघडे यांच्या घरच्या पाहुणचारा शिवाय पुर्णच होत नसे. त्यांच्यामुळे आम्हाला गो.नि.दा, गदिमा , सी.रामचंद्र तसेंच बाबुजी (सुधीर फडके) यांचे सारखे दिग्गज लेखक व कलावंतांना जवळून बघण्याचे भाग्य लाभले. जेवणे आटोपल्या नंतर त्या सर्व मान्यवरांच्या गप्पा-गोष्टी व हास्य-विनोदात आम्हा सर्व मुलांना सामील करून घेत. सर्व जण मिळून मग आम्ही सिनेमांच्या गाण्याच्या तसेंच कवितांच्या भेंड्या लावत असू. त्यामुळे मान्यवरांच्या कलेचे व त्यांच्यात असेल्या हुन्नरीचे दर्शन आम्हास आपोआप घडत असे. मुलांनी सिनेमा बघण्यास त्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे बाबा सगळ्यांना हवे हवेसे वाटत. अगदी त्यांच्या पराकोटीच्या कोपा सकट! अशा या बाबांच्या बहु आयामी व्यक्तिमत्वाला त्यांच्या जन्म शाताब्धीच्या निमित्याने माझी ही आदरांजली! आम्ही त्या वेळी विदर्भातील वर्धा या शहरी रहात होतो. माझे वडील वर्धा येथील गुरांच्या दवाखान्यात व्हेटरनरी डॉक्टर म्हणून नेमणुकीस होते. त्या वेळी माझे वय साधारण ५ वर्षांचे असेल. मी सर्वात मोठा. माझ्या पाठी ओळीने ३ बहिणी होत्या. माझा धाकटा भाऊ माझ्या पेक्षा १४ वर्षाने लहान असल्याने त्याचा प्रवेश आमच्या कुटुंबात व्हावयाचा होता. माझं आजोळ (आईच माहेर) वर्ध्याच. वर्ध्याला रामनगर भागात माझ्या आजोबांचे प्रशस्त घर होत. माझ्या आईची सर्वात मोठी बहिण म्हणजे आमची ताई मावशी. ती माझ्या आजोबां बरोबर वर्ध्यालाच राहत होती. तिला देेखील ४च अपत्ये होती. मोठी सुमाताई,(सुषमा) नंतर श्रीदादा, (डॉ.श्रीकांत चोरघडे) कुंदा, (डॉ.कुंदा ओक} आणी धाकटी प्रभा (सौ.स्नेहलता पिटकर). आम्हा मावस भावंडांत सख्ख्या भावंडा सारखाच एकोपा होता.

माझी ताई मावशी ही व्यवसायाने डॉक्टर होती. डॉक्टर वनिता वामन चोरघडे. आम्ही मावस भावंडे एकाच शहरात राहत असल्याने आमचे एकमेकांकडे सततचे जाणे येणे असे. माझ्या मावशीचे यजमान म्हणजेच प्रसिध्द कथाकार, लेखक व साहित्यिक प्राध्यापक वामन कृष्ण चोरघडे. आम्ही त्यांना बाबा म्हणूनच संबोधित होतो. यंदाचे वर्ष हे त्यांच्या जन्म शाताब्द्धीचे वर्ष आहे. त्या निमित्याने त्यांच्या काही हृद्य आठवणी.

बाबांची मला असलेली सर्वात पहिली आठवण म्हणजे, फटफटी या त्या काळच्या दुचाकी वाहना वरून येणारे बापूराव. माझे वडील व आई त्यांना बापूराव म्हणूनच हाक मारीत असत. त्या वेळी म्हणजे १९५०-५१ मध्ये फट फट फट फट….. असा आवाज करीत, येणाऱ्याची वर्दी साऱ्या आसमंताला देणाऱ्या फट-फटीचा थाट काही न्याराच होता.

फट फट फट…या आवाजा वरूनच त्यास फटफटी असे नाव पडले होते. ते नाव त्याची बोलती बंद करणारे सायलेन्सर चे कुलूप लागे पर्यंत प्रचलित होते. तर त्या काळी अशी फटफटी वापरणारे व घरात ग्रामोफोन आणी रेडीओ असणारे बापूराव म्हणजे माझे साठी जगातील सर्वात श्रीमंत इसम होते. पिळदार शरीराचे व सहा सव्वासहा फुट उंचीचे त्यांचे आडदांड व दरारा वाढविणारे राजस व्यक्तिमत्व त्या फट फटी वर शोभून दिसत असे. अशा या बापूरावांचा ती फटफटी रुबाब वाढवीत होती तर असे हे रुबाबदार व्यक्तीमत्व त्या फट-फटी ची शान वाढवीत असे.. त्यांचे ते रूप माझ्या मनात कायमचे कोरल्या गेले. त्या वेळचे बापूराव माझ्या मनात असे ठसले.

ते घरी आले की आम्हा भावंडांना जवळ घेउन बसत व छान छान गोष्टी सांगत. जेवण झाल्यावर वामकुक्षी करताना मला जवळ घेउन त्यांनी सांगितलेली चम्पा राणीची गोष्ट अजूनही मनात रुंजी घालत असते. ही गोष्ट त्यांनीच लिहिलेली होती. माझी चिमुकली सुंदर राजकन्ये सारखी दिसणारी नात जेंव्हा अवखळपणे स्वत:चा फ्रॉक सावरत मांडी पसरून बसताना पाहतो तेंव्हा चंपाराणीच्या कथेतल्या राजकन्येच्या पदान्गुलीतून झुळु झुळु वाहणारा पाण्याचा निर्मळ झरा बापूरावांची आठवण ताजी करतो.

स्वत: बाबा (प्रा. वामन कृष्ण चोरघडे) हे नागपूरच्या गोविंदराम सेक्सेरिया या कॉलेज मध्ये मराठी व अर्थशास्त्र हे विषय शिकवीत असत. नागपूरला त्यामुळे ते एकटेच राहत होते व कॉलेजला सुटी असली की वर्ध्याला येत.

स्वावलंबन हा बाबांचा मंत्र होता. ते स्वत:ची सर्व कामे स्वत:च करावयाचे व परिवारातील सर्वांनी त्याचा अवलंब करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. नेमून दिलेल्या कामात कोणी कुचराई केलेली त्यांना सहन होत नसे. बाबा अतिशय कडक शिस्तीचे होते. घरातील शिस्त जरा जरी कोणाकडून मोडल्या गेली की त्यांच्या रागाचा पारावर नसे. ते मग सर्वांना फैलावर घेत. त्यांचा राग शांत होई पर्यंत घरातील सर्व जण मग चिडीचिप असत. त्यांचा राग त्या वेळी तरी आम्हास अति भयंकर वाटायचा. ते ज्याच्यावर रागावतील त्याची घाबरून बोबडीच वळायची व त्याच्या हातून आणखीनच चुका व्हायच्या. त्यांचा तो कोप आम्ही भावंडांनी देखील अनुभवला आहे. अशावेळी त्यांच्या समोर कोणीही उभे राहण्यास धजावत नसे.

इतर वेळी मात्र ते सर्वांशीच अतिशय प्रेमाने वागत व सगळ्यांचीच अतिशय काळजी घेत असत. आम्हास हौसेने सिनेमास घेउन जात. सर्व मुलांना जमवून कवितेच्या तसेंच गाण्याच्या भेंड्या लावत. त्यांचा आणखी एक विशेष म्हणजे ते सकाळी घरातल्या सर्वांना बरोबर टेबलवर एकत्र बसून नाश्ता करीत असत. रात्रीच्या काही पोळ्या उरल्या असल्यास, त्याचा स्वत:च्या हाताने कुस्करा करून त्यात आमटी अथवा फोडणीचे रण घालून व हाताने फोडलेला कांदा मिसळून त्यावर तेल घालून छानसा काला करीत. आम्ही सर्व जण त्यांच्या सह मग तो काला मोठ्या चवीने मिटक्या मारीत खात असू. त्याच्या आठवणीने आज् देखील तोंडाला पाणी सुटते.

आम्हा मावस भावंडात इतके प्रेम होत की आम्ही जर भेटलो नाही तर आम्हास चैन पडत नसे. त्यामुळे आमचे वर्धेला असताना एकमेकांकडे वारंवार येणे-जाणे होत असे. काही दिवसांनी म्हणजे १९५३-५४ मध्ये माझ्या वडिलांची बदली दर्यापूर येथे झाली. त्या मुळे आमचे एकमेकांना भेटणे फक्त उन्हाळ्याच्या सुटीतच होत असे. कधी ती भावंडे दर्यापूर येथे येत तर कधी आम्ही नागपूरला जात असू.

या वेळ पर्यंत बाबांनी नागपूर येथे धरमपेठ या वस्तीत प्लॉट घेउन नवीन घर बांधावयास घेतले होते. काही खोल्या बांधून होताच चोरघडे कुटुंब नागपूरला त्यांच्या नवीन ‘राजीव’ या बंगल्यात स्थलांतरित झाले होते. मला मावशीचे बांधून तयार होत असलेले घर बघावयाचे होते. मी आईपाशी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला जाण्याचा हट्ट धरला होता. उन्हाळ्याची सुटी लागताच माझी आई मला व माझ्या पाठची बहिण बेबी ला घेउन नागपूरला आली. त्या वेळी आजच्या सारखे सर्वांकडे सर्रास फोन नव्हते. संपर्काचे फक्त पत्र हेच एकमेव साधन होते. आम्ही नागपूरला येत असल्याचे आईने मावशीला पत्राने कळवले होते पण ते पत्र नागपूरला आम्ही पोहचेपर्यंत मिळालेच नव्हते.

आम्ही मावशीकडे गेलो तेंव्हा मावशी मुलांना घेउन जबलपूर जवळील मंडला या गावी त्यांच्या परिचितांच्या आमंत्रणावरून १५ दिवसांसाठी गेलेली होती. घरी फक्त बाबाच होते. आम्ही दर्यापुरला परतण्याचा विचार करीत होतो पण बाबांनी मला व बेबीला मावशी व मुले ५-६ दिवसात परत येत असल्याने तेथेच त्यांच्या जवळ ठेवून घेतले. आई दर्यापुरला परत गेली.

त्या वेळी बाबांच्या नवीन घराचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. पुढील २ खोल्यांवर नुकतीच स्लाब पडलेली होती. बाबांनी आम्हा दोघांना काही कामे नेमून दिली होती. त्यापैकी एक म्हणजे दिवसातून २ वेळा नवीन पडलेल्या स्लाब ला नळीने पाणी देणे, दुसरे स्वयंपाक घरातील माठात पाणी भरून ठेवणे व दिवसात सकाळ-संध्याकाळी घरातील केर काढणे तेथील माझ्या वास्तव्यात मला ते रोज नविन नवीन गोष्टींची पुस्तके वाचावयास आणून देत. मी देखील आणून दिलेल्या पुस्तकांचा आधाशासारखा फडशा पाडीत असे. वाचण्याचा छंद मला त्यांच्या मुळेच लागला होता. बाबा आमचे तिघांचे जेवण स्वत:च बनवीत होते. आम्ही तिघेही मग एकत्र बसून जेवत असू. ते आम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी सांगत.

आठ–पंधरा दिवसांतून एक दिवस ते स्वत: घर कामा साठी काढीत. सर्व घराची साफ-सफाई स्वत:च्या निगराणीत घरातील सर्वांकडून करून घेत व स्वत:ही करीत असत.

तेथे असताना एकदिवशी त्यांनी घरच्या सफाईचे काम सकाळ पासून हाती घेतले. दिमतीस आम्ही दोघे भाऊ-बहिण होतो. का कोणास ठाऊक पण त्या दिवशी घरातील पिण्याचे पाणी भरण्याचे काम त्यांनी स्वत:च करण्याचे ठरविले व आम्हास स्लाबला पाणी देण्यास सांगितले. आम्ही स्लाबला पाणी घालून खाली आलो तेंव्हा बाबा स्वयंपाक घरातील माठात पाणी भरत होते. ते पाणी भरत असताना त्यांना अचानक माठाच्या मागे काही हालचाल दिसली. त्यांनी सावध होऊन पहिले तो मागे भिंतीजवळ एक लांब लचक असा पिवळा धमक साप फुत्कारताना दिसला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंडाव्या साठी त्याने पाण्याच्या माठा जवळ आसरा घेतला होता.

बाबांनी लगेच आम्हास दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितले. ते बाहेर गेले. येताना त्यांच्या बरोबर घरी माळी-काम करणारा १७-१८ वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाचे हातात एका टोकाला व्ही सारखा आकार असलेली लांब काठी होती व बाबांच्या हातात एक लांबसर बांबूची पातळ कमची होती. त्याला घेउन ते माठ जवळ गेले. आम्ही दुसऱ्या खोलीत जाण्याचे भासवून खोलीच्या दारा बाहेरून बाबा काय करतात ते भयं व उत्स्चुकते पोटी लपून पहात होतो.

बाबा त्या सापास हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते परंतु तो साप काही दाद देत नव्हता व फुत्कारून अंगावर येत होता. बरोबर आलेल्या मुलाने त्याच्या काठीच्या व्ही आकाराच्या टोकाने सापाचे तोंडाखाली मानेपाशी दाबून धरले व बाबांनी कमचीने त्या सापाच्या तोंडावर वार केला. वार बरोबर वर्मी लागून सापाचे तोंड चिरल्या गेले. काही वेळातच तो साप तडफडून वळवळत गतप्राण झाला. टळलेल्या अघटीत गंभीर प्रसंगाच्या कल्पनेनेच ते ओलावले होते. त्यातून सावरत त्यांनी या प्रसंगाने भेदरलेल्या आम्हा दोघांना आवेगाने पोटाशी धरले व अतिशय ममतेने आम्हाला थोपटत पाणावलेल्या डोळ्याने ‘ आज मला स्वत: पाणी भरण्याची देवानेच सुबुध्दी दिली’ असे म्हणत एक भयंकर घटना टाळल्या बद्दल देवाचे आभार मानले.

कठीण अशा श्रीफळाच्या आतील गोड शहाळ्याचे असे दर्शन त्या दिवशी आम्हास घडले. बाबा साहित्यक असल्याने त्यांचा मित्र परिवार फार मोठा होता. पुढे माझ्या वडिलांची बदली नागपूर येथे झाल्यावर आम्ही त्यांच्याच घरात तळ मजल्यावर राहत होतो. आमच्या स्वयंपाक घराला लागूनच त्यांची अभ्यासिका होती. कॉलेज मधील वेळे व्यतिरिक्त त्यांचा बहुतेक वेळ या अभ्यासिकेतच वाचन व लिखाणात ते व्यतीत करीत असत. त्यांच्याकडे लेखक व विचारवन्तांची कायम वर्दळ असे. बहुतेक सर्व क्षेत्रातील अग्रणींचा पदस्पर्श त्यांचे वास्तूस झाला होता. साहित्य व कला क्षेत्रातील विदुषींची नागपूर भेट प्रा.वामन कृष्ण चोरघडे यांच्या घरच्या पाहुणचारा शिवाय पुर्णच होत नसे. त्यांच्यामुळे आम्हाला गो.नि.दा, गदिमा , सी.रामचंद्र तसेंच बाबुजी (सुधीर फडके) यांचे सारखे दिग्गज लेखक व कलावंतांना जवळून बघण्याचे भाग्य लाभले. जेवणे आटोपल्या नंतर त्या सर्व मान्यवरांच्या गप्पा-गोष्टी व हास्य-विनोदात आम्हा सर्व मुलांना सामील करून घेत. सर्व जण मिळून मग आम्ही सिनेमांच्या गाण्याच्या तसेंच कवितांच्या भेंड्या लावत असू. त्यामुळे मान्यवरांच्या कलेचे व त्यांच्यात असेल्या हुन्नरीचे दर्शन आम्हास आपोआप घडत असे. मुलांनी सिनेमा बघण्यास त्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे बाबा सगळ्यांना हवे हवेसे वाटत. अगदी त्यांच्या पराकोटीच्या कोपा सकट! अशा या बाबांच्या बहु आयामी व्यक्तिमत्वाला त्यांच्या जन्म शाताब्धीच्या निमित्याने माझी ही आदरांजली!

— अविनाश यशवंत गद्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..