नवीन लेखन...

माझ्या मनातले…

ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्‍याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली.
असेच आम्ही गप्पा मारीत असताना मित्र म्हणाला, ‘‘एक गोष्ट सांगायची राहून गेलीच. मनातच राहिलीय, ती सांगतो.’’ तो सांगू लागला, ‘‘आम्ही अमेरिकन भूमीवर पाय ठेवला तेव्हा काळजी, चिता, उत्सुकता वाटत होती. इनिग्रेशनमधून कल्पनेच्या पलीकडच्या कमी वेळात बाहेर पडलो. तिथे एक सुंदर युवती वाट पाहात थांबली होती. तिथे माझ्या नावाचा तिच्या वळणाने उच्चार केला. ओळख पटली. गाडी तयारच होती. आम्ही गाडीने निघालो. विमानतळापासून इप्सित ठिकाणी येईतो खूप चर्चा, गप्पा झाल्या. प्रारंभी चर्चा होत्या मग गप्पा. ही युवती केवळ सुंदर आहे असे नव्हे तर ती बुद्धिमानही आहे, याची साक्ष पटत होती. तिच्या समयसूचकतेची साक्ष जाणवत होती. राजकारण, शिक्षण, संस्कृती, भारत-अमेरिका संबंध, त्यातले तणाव आणि जवळीकीच्या खुणा यांचे उल्लेख होत होते.
औपचारिकतेच्या सीमा संपवून आम्ही एकमेकांना एकेरी संबोधू लागलो तसे इंग्रजीत वेगळे काही नसते; तरी भावना जवळीकीची होती. मी प्रभावित झालो होतो. ती जवळच, शेजारी बसली होती. तिने लावलेला परफ्यूम सुखद अन् सौम्य होता; स्पर्श अनोळखी नव्हता. अमेरिकन माणसाला भारतीय माणसाबद्दल वाटणारा आदर ती व्यक्त होईल, अशा पद्धतीने मांडत होती. मी देत असलेल्या माहितीने अचंबित होत होती. अखेर गाडी एका विशालइमारतीजवळ थांबली. बँकेची इमारत होती ती. तिथे तिने काही सोपस्कार पूर्ण केले. माझ्या काही स्वाक्षर्‍या घेतल्या आणि क्षणात माझ्या हातात बर्‍याच मोठ्या रकमेचे प्रवासी चेक आले. माझ्या अमेरिकेच्या मुक्कामात मला त्यांचा मोठा आधार ठरणार होता. तेथून आम्ही बाहेर पडलो. अमेरिकन सेंटरमध्ये आम्हाला दौर्‍याचा तपशील, निवासव्यवस्था, स्थानिक मार्गदर्शक या सर्वांबाबत माहिती देण्यात येणार होती. तिथे तिने मला सोडले. माझ्या स्थानिक मार्गदर्शकाच्या हवाली केले. अतिशय आदबीने अन् स्नेहाने तिने माझा हात हाती घेतला, म्हणाली, ‘‘गेल्या दोन तासांच्या सहवासाबद्दल मी ऋणी आहे. माझे काही चुकले असल्यास मला माफ कर. तुझा इथला प्रवास सुखाचा होऊ देत.’’ एवढे झाल्यावर ती म्हणाली, ‘‘तुला काही सांगायचंय?’’ मी म्हटले, ‘‘नाही, धन्यवाद.’’ मी जेव्हा नाही, असे म्हणालो तेव्हा मला वाटत होते तिला सांगावे की, तू खूप छान मुलगी आहेस. तू सुंदर आणि हुषारही आहेस… पण ते तसेच राहून गेले. मनातले मनातच राहिले.

नंतरच्या काळात माझा मार्गदर्शकच माझा मित्र बनला होता. सलग १५ दिवस आम्ही बरोबर होतो. एक छान, मनमोकळे नाते तयार झाले होते. त्याला हाच किस्सा मी सांगितला. तो थक्क होऊन माझ्याकडे पाहात राहिला म्हणाला, ‘‘काय माणूस आहेस तू? इतकी छान कॉम्प्लिमेंन्ट दिली नाहीस? मनातच ठेवली? अरे, तुझ्या या प्रतिक्रियेने किती सुखावली असती ती. माणसाला कोणी चांगले म्हटले तर ते आवडेल का, असा विचारच कसा आला तुझ्या मनात? आता ती तुला भेटेल की नाही? कधी भेटेल, की कधीच नाही? हे काहीच माहीत नसतानाही तू बोलला नाहीस. खरेच, हे खूप वाईट झाले… आता माझ्याबद्दल काय वाटते ते तरी सांगून टाक -माझ्या त्या मार्गदर्शकाला मी काय सांगायचे ते सांगितले; पण आजही त्या वेळी मी काही बोललो नाही याची खंत वाटतेय. मनातले मनातच राहून गेले…
हे सारे आज आठवायचे कारण? हो माझ्या मनातले तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी. तुमच्या मनातले तुम्ही मनातच ठेवू नये यासाठी. हा फेब्रुवारी महिना मुळात मनातले काही व्यक्त करण्यासाठीच नव्हे का? मग ते प्रेम असो वा जिव्हाळा.
ज्याला तुम्हाला काही सांगायचे त्याचा अपमान करण्याचा, दुखावण्याचा हेतू तुमच्या मनात नसेल, तर बिनदिक्कत बोला. बोलून टाका. मनातले मनात ठेवू नका- या मनाचे त्या मनापर्यंत पोहोचू द्यात!

ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्‍याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..