माझी माय मराठी
शिवबाची
कणखर देशाची, ज्ञानेशाची
माझी माय मराठी
अलंकृत
अलंकार तिचे खुलवित
सौंदर्य
माझी माय मराठी
वृत्तात बंदिस्त
गझलकारा करितसे उत्तेजित
माझी माय मराठी
नव रसात चिंब चिंब भिजलेली
रसा -रसातून गर्जे भाव-स्पंदनांची तराणी
माझी माय मराठी
छंदात रमलेली
वाकवाल तशी वाकणारी
मराठीच आमुचा बाणा
मराठीच आमुची माता
तिच्या साठी झिजणार
सारस्वत
हाच तयांचा नारा
— सौ.माणिक शुरजोशी
Leave a Reply