नवीन लेखन...

माझी माणसं – अब्दुल

परवा टी .व्ही . वर ‘तानी’ सिनेमा पहिला . त्यातील सायकल रिक्षा पाहून मला माझ्या परळीतील  वास्तव्याची आठवण झाली . चाळीस -पन्नास वर्षा  पूर्वीचा तो काळ होता . त्याकाळी  ‘पब्लिक ट्रांस्पोर्ट ‘ साठी देवांनी दिलेले दोन पाय किंवा सायकल रिक्षा असायची .  फटफटी ,जीप हि खूपच श्रीमंती वहन . सामान्यांसाठी विरळच !

या सायकलरिक्षा फक्त दोन आसनी असत. सामान ,लहान पोर याना ‘पॅसेंजर’च्या पायाशी जागा असे . रिक्षावाले आपापल्या रिक्षांना खूप सजवायचे . हॅण्डलला रंगीत ग्रीपर , त्या ग्रीपरला झिरमाळ्या , प्रत्यक  चाकाला नायोलॉनचे गजरे , टपाल चमचमणाऱ्या टिकल्यांच्या माळा, काही विचारू नका ! अश्या सजवलेल्या रिक्षात बसलेकी आपण कोणी -राजे-महाराजे असल्या सारखे वाटायचे !

अब्दुल असाच एका ‘सजी-सवरी ‘ रिक्षाचा चालक . कळकट चौकटीघराची लुंगी, मळका पांढरा  सदरा , वेडी-वाकडी वाढलेली विरळ काळ्या -पांढऱ्या केसांची टोकदार दाढी ,बंडाच्या पायित्र्यातले  करडे-वरडे डोईवर केस ,त्यांना पाय बंध घालण्यासाठी कपाळाला लाल/हिरव फडकं ! असलं पाच साडेपाच फुटी काटकुळ ध्यान ! उन्हानं रापलेल्या चेहऱ्यावर गरिबी म्हणावे कि लाचारी असले भाव !

मी नुकताच बँकेत लागलो तेव्हा त्याची ‘ओळख’ झाली . तसा मी परळीतच लहानाचा मोठा झालो . त्याला बरेचदा रिक्षा ओढताना पहिले होते .
” साब ,एक रिक्षा लेनी  है ” एक दिवस तो बँकेत येऊन मला  म्हणाला .
“अभी एक है ना तेरे पास ?”
” हां ,है पर भाडे से चलता हू ”
“फिर ?”
” कर्जा ,देवना ! खुद् कि लुंगा ! भाडा जाकु कुच्छीच नय बचता .” त्याचा आवाज खूप लाचार अन दिन होता .
मी त्याला मॅनेजर समोर उभा केला . आर्थिक द्रुष्ट्या अति गरिबाना साठी DIR नामक योजने खाली आमच्या मॅनेजरने त्याला केवळ चार टक्के व्याजदराने रिक्षा मंजूर  केली . दोन दिवसांनी अजून दोन-चार भाऊबंद घेऊन आला !
“अब्दुल ,ये क्या ?”मॅनेजर भडकला .
“इंकू भी रिक्षा देव ना !”
“क्यू , सारी परली मी रिक्षा बाटनी है क्या ?”
“ये भी बहुत गरीब है ! सच्ची ! दुवा देंगे साब ! भुक्को मारलेले है ये लोंगा ! देव ना साब  !” अजिजीचा तो कडेलोट होता . आमचा मॅनेजर ‘रहेम दिलाचा  ‘ . सब को मंजुरी दे दि !

आठ – दहा दिवस हे पाच सहा जणांचं टोळकं गायब झालं . बहुदा रिक्षा प्रकरण सम्पले असावे . मी हि विसरून गेलो . पण कसले काय ? एका सोमवारी हे टोळकं रिक्षाच्या कोटेशनसह  हजर ! कोटेशन पाहून मी हादरलोच . सारी कोटेशन्स हैदराबादची ! परळीत रिक्षाची  चार दुकाने होती ! मग हैद्राबाद का ? काही काळे बरे तर नसेल? त्यांच्या हेतू बद्दल मनात शंका आलीच !

“ऐसा  नाय चलेगा ! हैद्राबाद का कोटेशन क्यू ? परलीमे  दुकान है ना ?”
“साब  मेहरबानी करो , बडी  मुश्किलसे ये कोटेशन मिले है , येच लेव ना . ” तो पुन्हा पुन्हा लाचारीने विनवीत होता .
“मै  तो ना करू ! ” मी हि हट्टाला पेटलो .
तो साहेबाकडे गेला . त्याने साहेबाला काय सांगितले माहित नाही पण दहा मिनिटात केबिन बाहेर आला . मला ते कोटेशन दिले . ‘pay by DD on Haydrabad ” या कोटेशन वरील शेरा मी पहात राहिलो !

सारी कागद पत्रांची पूर्तता , लोन documents , सह्या ,सगळे सोपस्कार करून दोन दिवसांत अब्दुल & कम्पनीला हैदराबादचे DD  दिले . त्यानंतर आमचा साहेब आठवड्याभरा साठी रजेवर गेला .

पाच सहा दिवस झाले तरी अब्दुल्या  गायबच ! तडक हैद्राबाद शाखेला फोन लावला . सगळे DD  पेड झाले होते ! बोंबला ! पंधराशे गुणिले पाच ,साडेसात हजारांची बँकेला चुना लागला ! (तेव्हा साडेसात हजार बरीच रक्कम होती !) गरीब लाचार तोंडाने अबदुल्याने  गंडवले ! काय बनेल माणूस ? असेलच काही काही विचार मनात घोंगावत राहिले . त्यात साहेब सुट्टीवर ,काय करावे कळेना . आज मंगळवार बँक सुटल्यावर अब्दुल्याच्या घरी जायचे ठरवले , तेव्हा मनाला कोठे चैन पडली . पण कामाच्या रगाड्यात  जमले नाही .

बुधवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान मी बँकेत आलो . माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना . सकाळच्या कोवळ्या उन्हात नव्या कोऱ्या पाच रिक्षा ओळीने उभ्या होत्या ! व त्यांची हॅन्डल धरून मलूल चेहऱ्यांची त्यांची मालक हि उभे होते !

“अब्दुल पावत्या आणल्यास का ?” मी विचारले
” हा , साब  लाया हू ”

मी खुर्चीत बस्ताना  त्याच्या हातातून पावत्या घेतल्या . त्या घेताना त्याच्या हाताला हात लागला . चटकाच  बसला ! मानवी देह इतका तापू शकतो ? !
“तेरे कु ,तो तेज बुखार  है !”
” हा ,थोडा है , हम सबकुच है !”
“मतलब ?”

त्यानंतर त्याने सांगितलेली कथा (कि व्यथा ) अशी होती . हैद्राबादला रिक्षा दोनशे रुपयांनी स्वस्त मिळतात , म्हणून तेथून घेतल्या ! रेल्वे खर्चा साठी हि मंडळी चार दिवस हमाली करत होती ! शिवाय जमेल तसे पै -पै जमवत होती ! हैद्राबादला रिक्षा घेतल्या नंतर ,तेथेच फिटिंग करून घेतली होती . आणि ….. आणि … त्या तेथून चालवत सुमारे चारशे कि. मी. परळी पर्यंत आणल्या होत्या ! सहा दिवस लागले होते ! शेवटच्या दोन दिवसात पैसे संपले ! उपाशी पोटी उन्हात …. रिक्षा  आणल्या ! सहाजिकच देहाने या अत्याचारा विरुद्ध तापाच्या रूपाने निषेध व्यक्त केला !

मला मेल्याहून मेल्या सारखे झाले ! त्यांच्या बद्दल मी इतका का शंकेखोर झालो ? थोडा सुद्धा धीर धरला नाही . गुन्हेगार ठरवून मोकळा झालो होतो ! त्यांच्या प्रामाणिक कष्टाचा एक प्रकारे मी अपमानच केला होता !

आज पर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो’चटका’दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे . प्रमोशनने बदली झाली ,परळीचे पाश तुटले , अब्दुल हि दुरावला .कधी कधी असे वाटते कि , असेच उठून परळीस जावे , रेल्वेतून उतरून अब्दुलच्या ‘सजी -सवरी ‘ रिक्षात बसून ‘ मंदिर चलो ‘ म्हणावे !पण क्षणात लक्षात येते कि आज अब्दुल नसेल ! त्याची ती रिक्षा हि नसेल ! मग …  मग एकदम रिकामं ,पोकळ वाटायला लागत ! काहीतरी कायमच गमावल्या सारखं उदास वाटत रहात !

— सुरेश कुलकर्णी

—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..