नवीन लेखन...

माझी माणसं – बनुचा बाबा

बनूच्या वेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हाच तो ‘बनूचा बाबा ‘झाला होता . बनूच्या बारशाला फक्त त्याचे ‘ बनुचे बाबा ‘म्हणून बारसे झाले इतकेच ! बनूच्या जन्माच्या वेळेस त्याने बनूच्या शिक्षणा साठी पॉलिसी घेतली होती . त्याच्या प्रीमियमने पगाराचा एक लचका तोडला होता . पण बनू साठी चालतंय . थोडी ओढ बसेल पण बनुचे भविष्य महत्वाचे , नाही का ? खरे तर पॉलिसी मॅच्युअर झाली तेव्हा ते पैसे तोकडेच पडले हि गोष्ट निराळी !

बनू लहान असताना बनूची आई लग्ना -कार्यात ,सिनेमा नाटक पहाताना  बनुचे बाबा बनूला वाजंत्रीवाले , वरातीचा घोडा , सिनेमाची पोस्टर दाखून त्याला खेळवत असत . बाजारात खरेदीच्या वेळी बनू बाबाच्या कडेवर असायचा . कधी चालताना झोप आली की बाबा तयारच असायचा . चटकन बनूला उचलून घ्यायचा ,मग भर उन्हातान्हात बनूच्या आईची खरेदी ,भाजीवाल्याशी घासाघीस विनासायास पार पडायची .

०००

खूप दिवसा पासून बनूच्या बाबाला लेदरचा बूट घ्यायचा होता . ऑफिसात तो एकटाच चप्पल वापरायचा दुकानात पाय ठेवणार तेव्हड्यात बनून शर्ट ओढला .
“बाबा मला  पण क्रिकेट साठी एक स्पोर्ट शु पाहिजे . कॅनवास बूट घालून खेळताना खूप लो वाटत . कॅनवास शु इन डोर गेम साठी असतात . ”
त्या दिवशी बनुचे स्पोर्ट शु घेतले गेले . किती हरकला होता बनू !त्याच्या चेहऱ्यावरला आनंद बघून बनूचा बाबा सुखावला होता . आपली आपल्या लहानपणी जशी आबाळ झाली होती तशी बनूची होऊ द्यायची नाही हे त्याने मनाशी पक्के ठरवले होते .
त्याच दिवशी संध्याकाळी बनूच्या बाबानी कोपऱ्यावरच्या चांभाराकडून तुटलेला चपलेचा अंगठा शिवून घेतला होता .
“साहेब ,आता पायताण बदला . तळवा पार झिझून गेलाय !” या चांभाराच्या शेऱ्या कडे ‘ बघू ‘ म्हणून दुर्लक्ष केले होते .

०००

“पार्ट -टाइम जॉब बघाना माझ्या साठी . ”
” काय ? पार्ट -टाइम जॉब ? आबे ,  सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत बँकेत काम करतोस ! का तर ओव्हर टाइम ! वर पार्ट -टाइम !झेपेल का तुला ? आणि मी म्हणतो कशासाठी ?”
“अरे , तस नाही . काय कि पुढल्या वर्षी बनूची अकरावी आहे . अकरावी -बारावी हि महत्वाची वर्ष असतात . शाळा -कॉलेज भागेल माझ्या पगारात . पण गणित ,विज्ञान ,इंग्रजी अश्या काही महत्वाच्या विषय साठी क्लास लावावे लागतील रे ! म्हणून म्हणतोय , प्लिज बघाना  जमले तर !”

०००

“काय ? वेड लागलंय का तुम्हाला ? हे रहात घर विकायचं ! अन आपण कुठं रहायचं ?रस्त्यावर ? ”
“आग ,माझं थोडं एकूण तर घे ! घर काय पुन्हा  घेता येईल ! तो वर राहू भाड्याच्या घरात ! बनूच इंजिनेरींग महत्वाचं आहे ! त्याच करियर महत्वाचं आहे . थोडी कळ काढ ना ? पैशाची बाकी काही सोया होत नाही , म्हणून हा निर्णय घेतोय !”
” अहो त्या पेक्षा एजुकेशन लोन घ्या ! पोराचं शिक्षण हि होईल आणि घर हि वाचेल !”
” नको ! शिक्षण -नौकरीच्या आधीच लेकराच्या डोक्यावर कर्जाचे ओझे नको ! हे घर विकू राहिलेले कर्ज वळते जाता दोन वर्ष्याच्या फी ची सोया होईल ! कर्जाचा हप्ता वाचेल तो भ्याडयात जाईल . नको काळजी करुस ! मी करतो सगळं व्यवस्थित . ”
” काय वाट्टेल ते करा ! पहिल्या पासून सगळा पालथा कारभार ! काय त म्हणे ‘ घर विकू ‘ ”
बनूच्या बाबानी घर विकले होते .!

०००

“आमच्या बनुचे हे इंजिनेरींगचे शेवटचेच वर्ष आहे . बी ई कॉम्पुटर होतोय ! तुमच्या बऱ्याच मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत . तेव्हा कोठे व्हॅकन्सी असेल तर जरूर सांगा ! तसे कॅम्पस इंटरव्हिव्ह होतात , पण या वर्षी कोणीच आले नाही म्हणे ! मंदी चालू आहेना . अहो, म्हणूनच काळजी वाटते . तेव्हा प्लिज लक्ष असू द्या ”

०००

” हे घ्या ,माधवराव पेढे ! आमच्या बनूला नौकरी लागलीय , बी .ई . झालायना तो ! छान मार्कानी पास  झाला होता . चांगलं सहा लाखाचं पॅकेज मिळालंय ! महिना पन्नास हजार ! त्याचेच हे पेढे आहेत ! मला नौकरी लागली तेव्हा महिना तीनशे रुपये होता ! चालायचं . असो .   —–तुमच्या कडे एक खाजगी काम होत . एखादी चुणचुणीत पोरगी पहाण्यात असेल तर  आमच्या बनूला ——–सांगा हो ! बार उडून देऊ ! विवाह मंडळात ठिकाण असतात पण माहितीतली मुलगी असलेली बरी . —-हल्ली काय काय कानावर येतंय . म्हणून म्हणलं कि बनू साठी ओळखीतलीच  मुलगी पहावी . ”
बनूचा बाबा बनूची नौकरी असो वा  छोकरी , कोठेही तोंड वेंगाडत असतो .

०००

अचानक बनूच्या बाबानी नौकरी सोडली ! अजून रिटायर्मेंटल पाच वर्ष बाकी होते ! अजून बनुचे लग्न हि झाले नव्हते ! त्यांनी असे का केले ?
” अहो तुम्हाला कळत कस नाही , हल्ली मुलींना पॉश फ्लॅट लागतो ! थोडं पी ओ पी आणि इंटेरिअर करून घ्या . ”
“आग ,पण इंटेरियर साठी खूप पैसे लागतील . किमान चार पाच लाख लागतील ! खरेच या क्षणी नाही जमायचं ग !”
“दळिद्री मेल लक्षण ! सदा पैशाची बोंबच ! पहिल्या पासून असच ! त्या गोखले बाईंनी चांगलं दहा लाखाचं इंटेरियर करून घेतलं . भेटीला आलेल्या पाहुण्यांनी साखर पुडाच ठरवला , त्याच बैठकीत त्यांच्या शेखरच लग्न ठरलं ! अहो इंटेरियर नाही केलं तर ,पोरग तसेच राहील ब्रम्हचारी ! मग मला दोष देऊ नका !”
बनूच्या बाबानी प्रयत्न केला पैशाची सोया झाली नाही . म्हणून त्यांनी नौकरी सोडली ! प्रव्हीडेंट फंड , ग्रँच्युटी मध्ये ‘इंटेरिअर ‘ चे काम झाले ! बनूच्या लग्नातला एक अडसर दूर झाला होता !
त्या नंतर बनुचे बाबा बारा  हजारावर कोठे तरी खाजगी कम्पनित नौकरी करत होते . का तर ‘वेळ जात नाही बघा घरी बसून ‘असे म्हणाले होते .

०००

तर हा असा ‘ बनूचा  बाबा ‘ . बिन चेहऱ्याचा , बिन अस्तित्वाचा ! ‘बनूचा बाबा ‘ या पलीकडे त्याला आयडेंटिटी नाही ! कसलीही महत्वकांक्षा नाही , तो जगतो तो फक्त बनू साठी ! नौकरीत नालायक बॉस शी जुळून घेताना अनेकदा लाचारी पत्करावी लागते . अन्याय सोसावा लागतो . मनातून चीड येते ,पेटून उठतो , पण ‘अजून त्याच शिक्षण व्हायचंय ! बनुचे कसे ? ‘या प्रश्नाला तो थांबतो .

०००

आता त्याचा  ‘बनू ‘ परदेशात  आहे . ग्रीन कार्ड मिळालाय ! बनूची आई ‘नातवाला सांभाळायला ‘ म्हणून तिकडेच गेलीय !
” तुम्हीहि का नाही गेलात बनू कडे ?”
” तसे बनू म्हणाला होतो ‘बाबा तुम्ही पण या इकडेच ‘ म्हणून , पण —-मला ना तिकडची हवा नाही सोसत बघा , म्हणून मीच नको म्हणालो !’
बनूच्या बाबाना सफाईने खोटे पण बोलता येत नाही ! बनून त्यांची सोय ‘ हैप्पी होम ‘ मध्ये केलीय ! सिनियर सिटिझन्स कम्युनिटी वगैरे गोंडस नावाचं ‘वृद्धाश्रम !’
त्यांना एकदा मी गमतीनं विचारलं .
” पुढच्या जन्मी तुम्ही पुन्हा ‘बनुचे बाबाच होणार का ?”
“नाही !”
“मग ?”
“पुढचा जन्म मिळालाच तर मी बनुची आई होईन !”
“का ?”
“अरे ,तो कसा आणि कधी मोठा झाला मला कळलंच नाही !त्याला कला कलानी , रोज फुलताना पहायचय !”
बनूच्या आईने बनूला नऊ महिने त्याला पोटात वाढवल. पण बनूच्या बाबानी त्याला आयुष्य भर सांभाळय , हृदयात ! बनूच्या आईच्या वेण्या जगाने पाहित्यात ,पण बाबाच्या वेण्या ———? त्या दिसणार नाहीत ,कारण त्यांची डिलिव्हरी कधीच नसते !
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात ,पण मला त्याही मागे एक ‘बनूचा बाबा ‘ दिसतो , एकटाच अंधारात !

समजा तो उद्या मेला ,आणि त्याच्या पिंडाला कावळा नाही शिवला तर ———–
” बाबा ,कसे आहेत ? ” येव्हडेच बनूने हात जोडून विचारले तरी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील !
‘  बनूचा बाबा ‘ असाच असतो .!

— सुरेश कुलकर्णी

—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..