मैक मोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी कराची येथे झाला. ‘शोले’ सिनेमात सांभा भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणा-या अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर? व मॅक मोहन यांनी दिलेले उत्तर ‘पूरे पचास… हा डायलॉग अजूनही फेमस आहे. त्यांचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये कर्नल होते.
मॅक मोहन यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यांना क्रिकेटर व्हायचे होते. १९४० साली त्यांच्या वडीलांची कराची येथून लखनौ येथे बदली झाली. त्यामुळे शिक्षण लखनौ येथे पूर्ण झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांचा उत्तरप्रदेशच्या क्रिकेट टीममध्ये सहभाग होता. क्रिकेटमधील पुढचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी १९५२’ साली मुंबई गाठली. मुंबईला आल्यावर घरुन मिळालेल्या पैशांवर गुजराण करणे शक्य नव्हते म्हणून उपजिविकेसाठी काही काम शोधणे गरजेचे होते. प्रसिध्द गीतकार कैफी आझमी यांची पत्नी शौकत कैफी आझमी या इप्टा या संस्थेकरिता एक नाटक करीत होत्या. त्यांना बारीक अंगकाठीचा पण स्पष्ट उच्चार असणारा कलावंत हवा होता. मोहन यांच्या एका मित्राने त्यांना नाटकात काम करण्याचा सल्ला दिला. त्यातून थोडेफार पैसेही मिळतील असे सांगितले. त्यामुळे मोहन शौकत कैफी यांच्याकडे गेला आणि इलेक्शन का टिकट या नाटकात पदार्पणाद्वारे त्यांच्या तोंडाला पहिल्यांचा रंग लागला. साहजिकच हिंदी नाटकातील भूमिका पाहून त्यांना १९६४ साली हकीकत या चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर त्यांनी क्रिकेटर होण्याचा विचार सोडून दिला व अभिनय हेच आपले कार्यक्षेत्र केले. चित्रपटसृष्टीतील आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १७५ चित्रपटातून भूमिका केल्यात. त्यात त्या काळातील आघाडीवर असणार्यार सर्वच दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. डॉन, कर्ज, सत्ते पे सत्ता, काला पत्थर, रफू चक्कर, शान, शोले या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या. मॅक मोहन यांच्या पत्नीचे नाव मिनी माखिजानी. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. मोठी मुलगी मंजिरी याच क्षेत्रात रायटर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे, तर विनाती ही मुलगी हिंदी चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. माय नेम इज खान, डेझर्ट डॉल्फिन, जो हम चाहे चित्रपट तिने साकारले आहेत. जो हम चाहे या चित्रपटाचे तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे. आता ती दिग्दर्शनाकडे वळली आहे. मॅक मोहन यांचे १० मे २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply