माझा जन्म…..
माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
या पृथ्वीवर ….
जन्म घेण्याशिवाय मला
दुसरा पर्यायच नव्हता….
मी… कोण? …
हे मला आता समजतं …..
बाबांच्या अेका शुक्राणूत होतं
त्यांच्या…आअीबाबांच्या ….
अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व…
आअीच्या बीजांडातही होतं
तिच्या…. आअीबाबांच्या
अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व…
तो जिंकलेला शुक्राणू…
ते मासिक पक्व बीजांड….
संयोग पावले ..आणि
माझा गर्भपिंड अस्तित्वात आला
याच गर्भपिंडानं केवळ
सदतीस आठवड्यात
अेक शरीर घडविलं.. धारण केलं
आणि नाळेविणा जगण्यासाठी
गर्भाशयाबाहेर पाठविलं.
तोच …मी ..
— गजानन वामनाचार्य, मुंबअी
Leave a Reply