मी रोजच जय जय स्वामी समर्थ आणि जय शंकर महाराज यांची मालिका बघते ऐकू येत नाही पण ओठांच्या हालचाली वरून समजून घेते. प्रसंग असा एका माणसाचे दैन्य दूर करण्यासाठी तो शंकर महाराज यांच्या कडे येतो आणि विचारतो की माझे दैन्य कधी संपणार? ते म्हणतात की मी मेल्यावर तुझे दैन्य संपेल. मी आवाक झाले. पुढे त्याचे दैन्य कसे संपते हे कळते. त्यामुळे वाटले की खरय अगदी मी पणा मेल्यानंतरच आर्थिकच नव्हे तर मानसिक. वैचारिक. थोडक्यात षडरिपूचे दैन्य संपेल…
मुलगा झाला पेढे वाटले. मुलगा पास झाला पेढे वाटले. मुलामुलींच्या लग्नाच्या वेळी आमंत्रण दिले. साग्रसंगीत जेवण थाटमाट केला. वारेमाप पैसा खर्च केला. पुढे नातू झाला पेढे वाटले. आणि इतके करुनही समाधान मिळेलच असे नाही. कारण पेढे वाटताना माझा मुलगा डॉ झाला मला नातू झाला. अमूक झाले तमूक झाले म्हणून मी हे पेढे आणले आहेत. म्हणून तुम्हालाही देत आहे. घ्या आणि आशीर्वाद द्यावेत असे म्हणत स्वसुखात रमतात. देणारे घेणारे दोघेही खूश….
एखादेवेळी पेढे किंवा अगदी साधे चुरमुरे. शेंगदाणे. फुटाणे. बत्तासा असे काहीतरी घेऊन एखाद्या मंदिरात जाऊन देवाला नैवेद्य दाखवला की तो प्रसाद होते. आता ते वाटताना हा घ्या प्रसाद असे म्हणत अनोळखी लोकांना वाटला जातो. या वेळी तो कशासाठी हे सांगत नाही आणि घेणारा सुध्दा विचारत नाही जे दिलय ते आनंदाने भक्तीने नमस्कार करुनच प्रसाद घेतो. पण हा विचार देखील मनात आणत नाही की हे एवढेच आणि असे का. यात मी तू पण उरलेले नाही. अगदी जो साखर खात नाही तो देखिल प्रसाद म्हणून दिलेल्या गोड पदार्थाचा एक कण खातोच. पण देवापुढे ठेवलेला नैवेद्य आणि तोच झाला प्रसाद. म्हणून तिथेच झाली मी तू पणाची बोळवण. आणि नेमके हेच शंकर महाराज सांगतात की मी माझे कर्तृत्व. माझेच असे असलेले बाह्य मी पण मेल्या वरच सगळीच दैन्य संपूर्णपणे संपून जातील. इतर वेळी कितीही खर्च करून दिलेले यात काही तरी खोड काढून नांवे ठेवली जातात आता एखाद्या देवस्थानात.जे काही जेवण देतात ते सगळे जसे जिथे मिळेल तिथे ग्रहण करतात. गाणगापूर येथे तर भले ते कुणीही असो माधुकरी मागतात आणि प्रसाद समजून आंनदाने घेतात. त्यामुळे देणारा घेणारा दोघांनाही आनंद व समाधान आणि मी तू पणाची बोळवण कशी करायची. मी पण कसे घालवायचे हे आपल्याला फक्त आपले सद्गुरू हेच सांगू शकतात. तसेच मार्गदर्शन करतात. म्हणून. वाट दाखवतात. ?
पाहे प्रसादाची वाट..
.
सौ कुमुद ढवळेकर
khup khup chhan.marmik vichar aahet.