विचित्र वाटले ना…सध्या रात्रीची झोप लागत नाही..अर्थात असे बऱ्याच जणांचे होत असणार हल्ली, बरेच दिवस झोप लागत नव्हती मागील वर्षी असेच झाले , पण झोपेचे सायकल सावरले.यावेळी पंधरा वीस दिवस मात्र सावरण्यापलीकडे गेले डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या
कारण त्यांना माझ्या चेहऱ्यावरून समजले ..
पाच सात दिवस घेतल्या ..
अर्धीच गोळी दिली
झोप बऱ्यापैकी लागली…
सात आठ दिवस लागले
काल नाही घेतली झोप गायब ..
रेड सिग्नल मिळाला ..
आज पासून ठरवले गोळी बंद दिवस भरपूर झोपून घेतले..
होईल ते होऊ दे
मग आठवले
आजच सकाळी कावळे खिडकीशी गोळा होऊन ओरडत होते .समजले नाही
मग आठवले त्यांना मी चहा पिताना एखादे बिस्कीट किंवा पोळीचा तुकडा टाकत असे ..
आज मात्र त्यांनी पोळीला तोंड नाही लावले ते ओरडत होते …
कावकाव करत होते ..काही समजले नाही ..मग बिस्कीट टाकले ते मात्र खाल्ले ..
त्यांना बिस्किटाचे व्यसन लागले होते
दोन तास ती पोळी तशीच पडून होती..
मग मात्र एकेक येऊन खाऊ लागला..
दुपारी तीनला परत माझी चहाची वेळ झाली..ते नेहमीप्रमाणे काव काव करत माझी वाट पहात होते .
मी पोळी चा तुकडा टाकला ..त्यांनी नाही घेतला..मी सरळ गॅलरीचा काचेचा दरवाजा बंद केला ..
अर्ध्या तासाने बघितले तेच कावळे पोळीचा तुकडा खात होते ..
मला झोपेच्या गोळीची आठवण झाली ..
कालपासून बंद केली होती ..
आता झोप लागो न लागो..
गोळी बंद..
दुपारनंतर झोप लागली..
झोपेच्या गोळ्या उचलून फेकून दिल्या …
बघू काय होते ..
जिथे कावळे सुधारले ..
तिथे
आपण कोण ?
मनात आले
ट्राय तर करू …।
— सतीश चाफेकर.
Leave a Reply