माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे ,
भिंतीकडे तोड करून…
समोर स्वाक्षऱ्या आहेत…
स्वतः येऊन केलेल्या..
मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश..
सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे…
शब्दाच्या रूपात…
तसाच तो ही आला होता…
इन्ग्रिड बर्गमन च्या भूमिकेमधील तिचे नाव घेतलेला ..
कवी ग्रेस …..
ग्रेस च्या कवितेत मला परत ‘ ती ‘ भेटली…
चेहरा नसलेली ती कोण होती…
आई होती , आणखी कुणी , आणखी आणखी कुणी…
मी तिला शोधण्याचा प्रयत्न करत होतो,
शोधून शोधून थकत होतो..
ती समोर होती शब्दरूपात ..
तर कधी एका वेगळ्याच वेषात ..
ती साधी स्त्री होती , आई होती , का समाजसेविका होती..
का आणखी कोणी पुराण स्त्री ..गूढ शब्दात..
तिला मी सतत शोधत असताना मला ती दिसली..
अत्यंत साधी, केस मोकळे सोडलेली …
अगदी इन्ग्रिड बर्गमन प्रमाणे दिसली मला…
मनात आले हीच ती ‘ ग्रेस ‘ असेल…
मला लक्षात येत नव्हते….
मी तिला विचारणार होतो…तू कोण..
तेवढ्यात तीच समोर आली..
तू राहतोस कुठे…
आपण भेटलो आहोत…
मी अवाक…
मी म्हणालो तू कोण …
मी इन्ग्रिड…
आयला हा काय प्रकार आहे…
मी तुला ओळखते..
तो तुझ्याकडे आला होता …एकदा..
मला काहीच समजत नव्हते…
इन्ग्रिड आणि भारतीय दिसणारी…
मला काहीच कळेना…
तरी पण आम्ही बोलत राहिलो…
बरेच काही बोललो…
मी सुन्नच राहिलो ती बरेच बोलून..
माझा हात हातात घेऊन म्हणाली ..
आणि येते म्हणून निघून गेली…
मी मात्र त्याच्या सहीकडे बघतच होतो…
भानावर आलो…
हातात त्याचेच पुस्तक होते..
प्रत्येक कवितेत ती भेटत होती वेगळ्या नावाने ..
आणि ..
पुस्तक वाचता वाचता ती मला भेटली होती…
तिला आठवत तसाच बसून होतो…
मी तसाच तासभर बसून होतो..
एकदम ब्लॅक…
परत परत …
…..
..
समोर तीच येत होती..
इन्ग्रिड बर्गमन ..
— सतीश चाफेकर
४४
Leave a Reply