अनेक वेळा एम.एफ. हुसेनला भेटलो होतो,
त्याची बहुतेक पैंटिंग्ज प्रत्यक्ष पाहिली आहेत ,
त्याला पैंटीग्स करताना सुद्धा,
त्याने मला एकदा जहांगीरच्या सॅमओव्हर मध्ये
कॉफी पिताना एक स्केचही काढून दिले होते,
त्याची मा-अधुरी …
माधुरी संकल्पना सॉलिड आवडली होती,
३० वर्षाची आई आणि ८० वर्षाचा मुलगा….
मला माझी ती अशीच दिसते..
नेहमीच तरुण , बिन्धास का कुणास ठाऊक
ती मला कुठे ना कुठेतरी भेटतेच..
नेहमी ..कदाचित रोज….
मला तिला शोधावे लागत नाही…
ती सरळ माझ्या समोर येऊन उभी रहाते…
जस्ट अपील मी…
आजही मला तशीच भेटली …
आमची अशीच ओळख निघाली ..
कॉलेजवरून ..एक मुलीवरून…
ती तिला ओळखत होती आणि मीही…
आणि आता तिच्यामुळे मी पण तिला
ओळखू लागलो ..
ती अचानक म्हणाली तुला कुठेतरी पाहिले आहे..
कदाचित टीव्ही वर असेल..किंवा टाइम्समध्ये फोटो बघीतला असेल..
मी कोण ते तिला सांगितले…
आमची ओळख आणखी वाढली
…
का कुणास ठाऊकी मी पटवण्यात
आणि पटण्यात एक्सपर्ट आहे…
मला एक जाणवले प्रत्येकामध्ये आणि
प्रत्येकीमध्ये एक व्हॅक्युम असतोच असतो…
हाच व्हॅक्युम अनेक वेळा मला तिच्याशी
आणि तिला माझ्याशी मैत्री करण्यास कारणीभूत होतो,..
कितीही घरी सुबत्ता असो, सर्व सुखे असो..
हा व्हॅक्युम तयार होतोच होतो..
कारण एकच …
चंचल मन….
चंचल शरीर आणि चंचल…वासना..
कुठेतरी काहीतरी शोधात असतेच असते…
ती म्हणाली आपण भेटू रे…
बरे वाटले तुसझ्याशी बोलून …
मी पण तिला तेच म्हणालो…
कुठेतरी शब्दाने जवळ येत होतो…
मग मनाने …आणि त्या मनाला पटले
तर शरीराने ….शरीराने नाकारले तरी
मन नाकारत नाही हे कबूल केतेच पाहिजे ..
कारण एक भीती असते ती एकाच शब्दाची ..
व्यभिचार…..मनाने चालतो…
मग शरीराने का नाही..
मुळातच हा शब्दच चुकीचा आहे..
हे मी तिला पटवून देत होतो..
आणि तीपण तेच मला पटवून देत होती
आणि सांगत होती
हा शब्दच हलकट आणि चोर आहे…
आम्ही कधी ह्या शब्दावर एक झालो हे कळलेच नाही…
अनेकदा भेटलो..
खरेच खूप चर्चा होत होत्या….
ती काय करते..
मी काय करतो..
ह्यावर चर्चा होतच नव्हती….
एक वेगळे आकाश उघडत होते…
हुसेनच्या चित्राप्रमाणे…
स्त्री पुरुष आकृत्या होत्या..
पण त्याला चेहरे नव्हते…
मजा येत होती…
आम्ही वरचेवर भेटू लागलो…
हुसेन नंतर विषय निघत असे तो पिकासोचा ..
नशीब पिकासो आमच्या येथे जन्माला आला नाही..
त्यालाही पोचवला असता आमच्या सो कॉल्ड संस्कृती रक्षकांनी …
आम्ही या चित्रांच्या गप्पामुळे एकत्र आलो..
तिने घरी बोलवले….
घर कसलेच , बंगलाच होता..
आत भितींवर महागडी पैंटीग्ज होती..
मी तर पार हबकून गेलो…
बोलता बोलता म्हणाली..
शँपेन घेणार….
आयला बीअर वाला मी शँपेनवर आलो…
ठरवले आपण निव्वळ मैत्री करायची..
नो सेक्स आणि तत्सम काही..
पण ते आमच्या दोघांच्याही हातात नव्हते..
हातात होते ते ग्लास …?
ती ग्लास भरत होती…
आमच्या गप्पा चालूच होत्या..
ती मला आणि मी तिला जास्तच
आवडू लागलो होतो..
शॅम्पेनची बाटली रिकामी होत होती..
दुसरी आली..
फेस भरभरून निघाला….
त्या आवाजाने बरे वाटले..
कारण आमची मैत्री आता
‘ घट्ट ‘ होत होती…
फेसाळणारी …
— सतीश चाफेकर
३९
Leave a Reply