नवीन लेखन...

मी आणि ती – २० (कथा)

कानाला हेडफोन होते,
सहज पंकज उधासचे ‘वतन से चिट्ठी आयी हिँ गाणे ऐकत असताना
संपूर्ण भूतकाळातच गेलो.
आज तू इथे नाहीस,
आहेस कुठे तरी परदेशात
२० वर्षे झाली, सपंर्क नाही.
पण तू मात्र चांगलीच आठवतेस.
सडसडीत, एक लांबलचक वेणी,
उंचच होतीस माझ्यापेक्षा त्यावेळी.
आता कशी आहेस हे माहित नाही.
पण कॉलेजमध्ये असताना मला आठवतंय मी पुस्तके
लायब्ररी मध्ये ज्या टेबलावर ठेवायचो त्याच
रांगेत तू शेवटी बसायची, अगदी ठरवून तुझ्या त्या मैत्रिणीबरोबर,
ती भांडुपला रहात होती तू कुठेतरी कर्जतच्या पुढे
ओळख वाढली.
बंक मारून भटकायचो आपण.
तुझी काही पत्रे अजून माझ्याकडे आहेत.
वाचतो कधीकधी तेव्हा तुझा चेहरा येतो समोर.
त्यानंतर वर्षभर आपण भेटलो.
मग कॉलेज संपले, पांगलो आपण त्यावेळी
घरात फोन नसत, असेच भेटणे असे. चिट्ठी हेच साधन
साथीला तुझ्या पोस्टमन मैत्रिणी होत्याच.
आज सगळं सगळं आठवतंय.
त्यानंतर परत भेटलीस
ते आठ ते दहा वर्षाने,
गळ्यात लायसन होते.
मी जास्त बोललो नाही.
तुझ्या नवऱ्याचा विषय तू काढला नाहीस, मी पण नाही.
पण थोडेफार बोलणे झालेच म्हणजे जुन्या आठवणी
त्यानंतर तू परदेशात गेली ती गेलीस.
माझा मुलगाही परदेशात असतो.
शिकला आहे लग्नच करत नाही.
मी इथे एकटा,पैसा बऱ्यापैकी आहे.
मुलगाही पाठवतो.
काल मुलाचे लग्न झाले तो म्हणाला
इथे आल्यावर समारंभ करू म्हणाला.
दोन-तीन महिन्यात येणार आहे तो.
पण आज बघीतले सकाळी..
त्याचे रजिस्टर लग्न झाले.
काल सर्व फोटो नीट पहाता आले नाहीत.
फोटो पहात होतो काय तिच्या मैत्रिणी
बघून बघून कंटाळा आला,
फोटो बघणे म्हणजे फुल कंटाळा असतो, इतके फोटो म्हणजे
धडाधड फोटो सरकवताना
एका फोटोत ती मुलगी आणि एक दोन-तीन म्हाताऱ्या होत्या.
दोनतीन म्हातारे होते.
तितक्यात मुलाचा व्हाट्स अप मेसेज आला.
गप्पा मारू लागला मुलगा सून ओळखी झाल्या
सून म्हणाली ही माझी आई
मी त्या बाईकडे पाहिले आणि हादरलोच .
अरे ती कॉलजमधली माझी मैत्रीण होती सडसडीत.
जाम म्हातारी दिसत होती. बोलणे झाले.
तिने मला ओळखले असणारच.
ती चूप होती.
कारण
माझ्या मुलाचे आडनाव.
मी आरशासमोर उभा राहिलो तेव्हा लक्षात आले..
केस डाय करायला पाहिजेत.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..