नवीन लेखन...

मी कोरोना !!

आजकाल माझं महत्त्व विचारायचं झालं तर ते मानवजातीला विचारा , कारण मी ‘कोरोना’!!. पूर्ण नाव SARS-CoV-2.

माझा जन्म चीन मधल्या वुहान शहरात ४-५ महीन्यांन पूर्वी झाला. आता तुम्ही विचाराल की इतक्या कमी वयात सुद्धा माझं महत्त्व का? तर त्याच कारण म्हणजे , ह्याच काळात मी संपूर्ण जग काबीज केले म्हणून.४० लाखांपेक्षा जास्त लोकांच्या शरीराचा भाग आहे मी! थोडं उशिरा का होईना, पण मला सुद्धा भारतीय होण्याचा सन्मान मिळाला. आता मी सुद्धा तिरंग्याला सलामी देतो! पण ज्या देशात ‘ अतिथी देवो भव:’ सर्वांमध्ये ठासून ठासून जिरलेले आहे , त्या देशात सुद्धा मी आत शिरू नये आणि शिरल्यास इतर भागात कसा पसरू नये ह्यासाठी छातीला माती लावणे सुरू आहे. का? आता कुठे गेली तुमची so called संस्कृती?

पण माझं कसं आहे की मी फक्त ‘ Go Corona Go’ इतक म्हणल्यावर जात नाही, कारण मी थोडा हटके आहे, माझा नाश करणं इतकं सोपं नाही, बरंका!! मला देश, धर्म, जात-पात, श्रीमंती-गरीबी असा भेदभाव मुळीच आवडत नाही, आणि तो मी करत सुद्धा नाही, कारण You Know? माझं atomic structure अजून तरी कुणाला नीट कळलंय असा दिसत नाही, शेरेबाजी करायची झाली तर ‘ हम हम है, बाकी सब पानी कम है’! वगैरे! वगैरे! कारण तुम्हाला कळलं देखील तरी वळेल का? ह्यात मला शंका नाही तर खात्री आहे, कारण तुम्ही reactive आहात , pro-active मुळीच नाही, बघा! कसं जमतंय ते तुम्हाला?

माझी निर्मिती नेमकी कशी झाली, हा एक मोठा वादाचा मुद्दा आहे आणि कोणी केली हा त्याहून जास्त! का ? मला नाही का हक्क माझे आई-बाप जाणून घेण्याचा? International Laws याची परवानगी देत नाही का? ठीक आहे! मग असं समजा कि मी याच शोध मोहिमेवर आहे. फरक फक्त एवढाच की ही मोहीम अतिशय तीव्र गतीची आहे. झेपेल ना तुम्हाला?

माझी निर्मिती जर तुमच्या हाताने झाली असेल तर कृपा करून मला दोषी ठरवू नका. मला तर वाटलं तुम्ही हुशार आहात, well educated आहात, चंद्रावर जाऊन पोहोचलात, तर तुमच्यासाठी ‘ मी कोरोना’ अतिशय क्षुल्लक बाबा असायला हवी होती. पण सध्यातरी हे चित्र दिसत नाही , ‘ अब आया ना उंट पहाड के नीचे’!!

एकदा गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मस्त थंडगार वाळूत रात्रीचे चांदणे बघत विचार करत बसलेलो होतो , का झाली असेल माझी निर्मिती? आता लगेच प्रश्न पडला असेल तुम्हाला, गोवा, तिथला समुद्र, रात्रीचे चांदणे आणि चंद्रप्रकाशातला हा विचार, म्हणजे नक्कीच मी थोडी घेतली तर नसेल? But you stupid people won’t get that मी आजन्म alcohol च्या उपवास वर आहे, alcohol च्या संपर्कात आल्या आल्या माझा नाश होतो असं म्हणतात. असो! तर का झाली असेल माझी निर्मिती? उत्तर एकच-तुम्हाला सळो कि पळो करून सोडायला! तुम्हाला रडवायला! इतकंच नाही तर तुमचा अहंकार ठेचायला!!

अहंकार? हो अहंकारच! कारण माझा प्रादुर्भाव वाढण्या आधी तुम्ही ज्या शर्यतीत होतात, ती शर्यतच मी संपुष्टात आणली आहे. होय! प्रथम फक्त मीच! बाकी सगळं कसं दुय्यम! म्हणजे बघाना जवळपास सगळे व्यवसाय बंद! जीवनावश्यक गोष्टी तितक्याच उपलब्ध आहेत तुम्हाला. लहानपणी घोकंपट्टी करून लिहिले असाल की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. आला की नाही प्रत्यय? काय? तुमच्या materialistic जगाच्या मुसक्या आवळायला मला फारसा वेळ सुद्धा लागला नाही. I mean’येतो मेरे बाय हाथ का खेल था’! आता नाचा, तुमच्या गाड्या-घोड्या डोक्यावर घेऊन. परिस्थितीच अशी आणून ठेवली आहे मी की,जगातल्या सर्वात बलाढ्य देशाला सुद्धा मला घालवण्यासाठी औषधी आयात कराव्या लागल्यात, लक्ष वेधून घेणे हे फारच छान प्रकारे जमलंय ब्वा मला! आणि यालाच म्हणतात sheer dominance!!

पण मानवजातीचं अजबंच चाललेलं असतं,lockdown घोषित झालं, stay home – stay safe इत्यादी घोषणा कराव्या लागल्या, तरीही माणसं ऐकत नाहीत? यांनाच म्हणतात बुद्धिहीन माकडं! आता काहींना राग पण येईल माकड म्हटल्याचा, पण इतिहास इतक्या सहजरित्या बदलला जात नाही. इतकच काय तर lockdown मुळे सगळीकडे झुंबड करणारी माणसे अचानकच कमी झालेली दिसत आहेत, त्यामुळे पृथ्वीला सुद्धा मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळालाय. आर्क्टिक महासागरा वरच्या ओझोनला पडलेले छिद्र कमी झाले आहे. नद्या स्वच्छ होतात आणि हे सगळ पाहून माणसं खूप खूप होत आहेत. काय तर म्हणे ‘ The Earth is Healing!!’म्हणजे आधी एक मोठी चूक क्लोरोफ्ल्युओरोकार्बन सोडून करायची,नंतर माझी निर्मिती करून अजून मोठी चूक करायची आणि पहिली चूक स्वतः दुरुस्त केल्यासारखी स्वतःचीच पाठ थोपटवायची! Kya baat hai BHIDU!! मग मला नक्की सांगा VIRUS कोण तुम्ही? कि मी? परत माझ्या प्रादुर्भावामुळे माणसं मृत्युमुखी पडत आहेत, म्हणून मला Murderer घोषित केले आहे तुम्ही लोकांनी, पण मला कळलय, छळ तुम्ही केलाय! भोगाल सुद्धा तुम्हीच! Because I am VACCINE and YOU are the VIRUS.

असं नाहीये की मला काहीच पटत नाही मानवजातीचं, तुमचं जीवन जगण्याचं spirit हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे,सगळे लोक घरात बंद असून देखील कसे स्वतःला व्यस्त ठेवता येईल हा प्रयत्न करताहेत. Challenges देऊन स्वतःचे छंद, ज्ञान, कौशल्य जगासमोर सादर करीत आहेत say thanks to me!! कधी नव्हे तर पुरुष मंडळी देखील महिलांना घरकामात मदत करत आहेत, खरंच किती छान बाब आहे ही!आज अशी परिस्थिती आहे की अगदी दुश्मनाचा सुद्धा हालहवाल लोक विचारत आहेत. Information technology हे नक्कीच वरदान आहे यात शंका नाही. आज हेच क्षेत्र लोकांना जवळ आणत आहे, एकमेकांना बांधून ठेवत आहे.

कधीकधी खूप वाईट सुद्धा वाटतं की माझ्या प्रादुर्भावामुळे इतकी लोक मरण पावत आहेत. खरंच काय चुक होती या लोकांची? आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या परिजनांची? मनावर कोरल्या गेलेला डाग कसा मिटवू? नक्की कसे वाहून नेऊन मी हे पश्चातापाचे ओझे?

मध्यंतरी एका परिवारासोबत महाभारत बघण्याचा योग आला,त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला धर्म आणि अधर्म समजावून सांगताना दिसला, माझ्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण झाला, नक्की काय असेल माझा धर्म? कदाचित एका पेशीचे अनेक पेशिं मध्ये रूपांतर होणे एवढेच? की अजून काही? फक्त वृद्धी हाच माझा धर्म असू शकतो का? आणि नाहीच तर विवंचनेत अडकलेल्या ह्या अर्जुनाला (मला) कोण भगवान श्रीकृष्ण नीट मार्गदर्शन करणार? याची मला कायम प्रतीक्षा राहणार.

सध्या जगाच्या विकासाची बांधणी अशाप्रकारे मांडण्यात आली आहे की माझा प्रादुर्भाव संपल्यानंतर खऱ्या समस्या अतिशय गंभीर स्वरूपात डोकं वर काढतील.आर्थिक दृष्ट्या बलाढ्य करण्याची स्पर्धाच मला मोडीत काढायची आहे.मी लावलेला एक महायुद्धच म्हणता येईल and believe me! it’s gonna be Trend changing as well as Trend setting.

मानवाने ह्या संधीचा उपयोग जर झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या उद्देशाने केला, तरच योग्य! आणि जर ह्या संधीमुळे जगातील स्पर्धा अधिक वाढली, तर धन्यच! मैं बड़ा! मैं बड़ा! करणं सोडावा आता, आणि जगण्याचा नवा मार्ग शोधावा, नाहीतर Thums Up ज्या जाहिराती प्रमाणे ‘आज कुछ तूफानी करते हैं!’असं म्हणता म्हणता, तुम्हाला इतक्या तुफानांना सामोरे जावे लागेल की निस्तरण अवघड होईल.जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगावी हीच अपेक्षा आणि जर आता सुधारले नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.

काही दिवसानंतर तुम्ही माझ्यावर विजय मिळवला असेल, नवीन आयुष्याला सुरुवात देखील केली असेल, कालांतराने मला विसरून सुद्धा जाल. But I am confident तुम्ही human error ह्या शीर्षकाखाली पुन्हा पुन्हा चुका करत जाणार आणि ‘ मी कोरोना’ कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पुन्हा तुमच्यासमोर येणार. वह क्या बोलते ‘ यह तो सिर्फ Trailor था!!Picture तो अभी बाकी है मेरे दोस्तों!! Untill We Meet Again….

आदित्य कोकर्डेकर,
सिल्वर मिस्ट, पोरवाल रोड,
लोहगाव पुणे 47,
मोबाईल 9890910721

लेखकाचा ई-मेल :
aditya.kokardekar@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on मी कोरोना !!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..