मी
कैनेरी चिमणीचा
पुनर्जन्म आहे,
जिला उतरवले जाते
खोल कोळशाच्या खाणीत
ऑक्सीजनचा अंदाज
घेण्या साठी.
मी आज सुद्धा
खोल अंधारात
नात्याच्या खाणीत
ऑक्सीजनचा शोध घेते…..
न जाणे कधी तरी
मी होते पळस
जो भर उन्हात
बहरून येतो
जो सर्वांना जीवन रस
देण्यासाठी खोल
ओल शोधीत जातो,
अस्थिर वादळात सुद्धा
मी स्थिर आहे
शाश्वत आहे माझे स्मित
दाहक लाल रंगात
मी हसू शकते,
सर्व रुक्ष वातावरणात,
कधी एखाद्या जन्मात
मी असते चकमक दगड
जो हृदयात ठेवते अग्नी
आज सुद्धा अग्नी
माझ्यात जिवंत आहे
दुसऱ्या चकमक बरोबर
स्पर्श झाला की
ठिणग्या उडतात
माझ्या जीवनात,
कधी मी असते सदाबहार बकुळ फुल
सदैव सुगंधित असते अल्पकाळ
या क्षणी सुद्धा
मला क्षणभंगुरता
विचलित करीत नाही,
हे उमजून पदर ओढते
छोट्या छोट्या आनंदाने
अल्पजीवी क्षणा साठी,
कधी कधी मी
निवडुंग असते काटेरी
सचेत करते सर्वांना दुरून
या जन्मी सुद्धा मला
अभिमान आहे
माझ्या काटेरी रूपाचा,
खूप दिवसांनी
मी फुलारून येते अचानक
ते माझे रूप असते सुंदर व दुर्लभ,
(ब)
मी कधी असते खार
माझ्या अंगावरील
पट्ट्याची कथा
मला माहित आहे,
मी माझ्या छोट्या वाटेची
आहुती यज्ञात समर्पित करते
अगदी निःसंकोचपणे
कधी मी घनदाट सावलीचा
वटवृक्ष होते
ज्यावर निवारा घेतात
पक्षी व अतृप्त आत्मा
या वेळी पक्षी दिवसा
आनंदाने चिवचिवाट करतात
आणि
रात्री अतृप्त आत्मे
अतृप्त आठवणी जागवतात,
मूळ हिंदी कविता – सुनीता मेहन, जयपूर
मराठी अनुवाद – विजय नगरकर
Leave a Reply