माजाचे मुखवटे का असे आता गळाले
का कुणी त्यांना सत्याचे आरसे दाविले
मी म्हणता मी मध्ये आत आत बुडाले
दलदलीत अहंकाराच्या जात जात निमाले
गडगंज धनाने का कुणा असे राज्य मिळाले
कितीकांचे कवड्यांमध्ये काचेचे महाल जळाले
करतो मी, करतो मी करीत कर्म हे जमविले
कर्माचे भोग भोगण्या मग आता का पळाले
तुझ्या सारखे कितीक आले आणिक गेले
सत्याचे झेंडे मात्र नेहमीच उंचावरी फडकले!!
— वर्षा कदम.
Leave a Reply