मी तुझी शाई बनू इच्छिते
मी शब्दांच्या त्या गल्लीत जाऊ इच्छिते
जिथे कविता कथेच्या गळ्यात गळा घालून
चालत असते,
माझ्या तमाम दुःखाच्या,
पराभवाचे विष प्राशन करणाऱ्या
नीलकंठ लेखणीला
सृजन करण्याचे सौंदर्य मला बहाल कर,
मी या शाईने लिहू शकेल
या प्रकाशमान विश्वाचे सफेद अक्षर
मला सांभाळून घे लेखणी
मी तुझी शाई बनू इच्छिते.
मी कागदाच्या देहावर गोंदण होऊ इच्छिते
मी जगाशी व्यक्त होऊ इच्छिते की
कागदाच्या संगमरवरी देहावर
लिहीन मी एक प्रार्थना
जी ताजमहल पेक्षा अधिक सुंदर असेल,
मला घडवण्याची ताकद दे ब्रह्मा !
मी तो हातोडा होऊ इच्छिते
माझा मान अपमान
माझा संघर्ष
माझी ओळख
या सर्वांना ओलांडून गुंजत राहू इच्छिते
मी शब्द नाद होऊ इच्छिते
मूळ हिंदी कविता – ” मैं तेरी रोशनाई होना चाहती हूँ ”
– अलका सिन्हा
मराठी अनुवाद – विजय नगरकर
बहुत सुंदर अनुवाद है। मूल की सुगंध से भरा। मेरे मनोभावों को मराठी पाठकों के बीच प्रस्तुत करने वाले सेतु मित्र विजय नागरकर जी को हार्दिक बधाई एवं धन्यवाद।